​आईने दिले मुलाला ‘अनोखे’ गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2016 17:56 IST2016-08-21T12:20:58+5:302016-08-21T17:56:20+5:30

जेक ओस्ट्रोवस्की नावाच्या या १९ वर्षीय मुलाला त्याच्या आईने घरातील कुत्र्याचे लाईफ-साईज कार्डबोर्ड गिफ्ट केले.

Mother gave 'Unique' Gift | ​आईने दिले मुलाला ‘अनोखे’ गिफ्ट

​आईने दिले मुलाला ‘अनोखे’ गिफ्ट

लगा जर कॉलेजसाठी दुसऱ्या  शहरात राहायला जाणार असेल तर पालकांनी त्याला काय गिफ्ट द्यायला हवे? त्याच्या आवडीचे कपडे-बाईक किंवा घरचे अगदीच ‘टाईमपास’ चित्रपटातील वैभव मांगलेप्रमाणे असतील तर  थोर व्यक्तीचे विचार असलेले पुस्तक गिफ्ट दिल्या जाऊ शकते नाही का? पण अमेरिकेतील एका मुलाला त्याच्या आईने अजबच गिफ्ट दिले.

जेक ओस्ट्रोवस्की नावाच्या या १९ वर्षीय मुलाला त्याच्या आईने घरातील कुत्र्याचे लाईफ-साईज कार्डबोर्ड गिफ्ट केले. जेक आणि त्याचा कुत्रा खूप घनिष्ट मित्र आहेत. जेक घर सोडून जाणार म्हटल्यावर त्याच्यासाठी काही तरी स्पेशल गिफ्ट देण्याचा विचार त्याच्या आईने केला. आता कुत्रा तर त्याच्यासोबत जाऊ शकत नाही. म्हणून मग आईने कुत्र्याचा फोटो नाही तर मस्त लाईफसाईज कार्डबोर्ड बनवले आणि आठवण म्हणून जेकला गिफ्ट केले.

जेकने जेव्हा या कार्डबोर्डचा ट्विटरवर फोटो शेअर करून आईच्या गिफ्टबद्दल सांगितले तेव्हा ते चांगलेच व्हायरल झाले. हजारो लोकांनी ते रिट्विटदेखील केले. तो म्हणतो मला मिळालेल्या गिफ्टपैकी हे सर्वोत्तम गिफ्ट आहे. कित्येक लोकांनी मला सांगितले की, तेदेखील असे कार्डबोर्ड बनवणार आहेत किंवा आईला दाखवणार आहेत.

‘प्रसिद्ध मिळवून दिल्याबद्दल’ जेकने आपल्या आवडत्या कुत्र्यासोबत फोटो ट्विट करून त्याचे आभारदेखील मानले.