शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

सेम टू सेम... आई-मुलाची स्टायलिश जोडी, एकमेकांचा सारखाच पेहराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 19:14 IST

सध्या आई-वडिल आणि मुलांनी मॅचिंग आउटफिट्स वेअर करण्याच्या ट्रेन्ड आहे. अनेकदा तर संपू्र्ण कुटुंबाचेच कपडे मॅचिंग असतात. परंतु आज आम्ही अशा आई आणि मुलाच्या जोडीबाबत सांगणार आहोत.

सध्या आई-वडिल आणि मुलांनी मॅचिंग आउटफिट्स वेअर करण्याच्या ट्रेन्ड आहे. अनेकदा तर संपू्र्ण कुटुंबाचेच कपडे मॅचिंग असतात. परंतु आज आम्ही अशा आई आणि मुलाच्या जोडीबाबत सांगणार आहोत. जे नेहमी मॅचिंग आउटफिट्समध्ये दिसून येतात. पाथ्रापोल आणि ली पुइंगबुनप्रा या दोन्ही मायलेकांना वेगवेगळ्या फॅशन स्टाइल्स फार आवडतात. थायलँडमधील बँकॉकमध्ये राहणाऱ्या स्टायलिश मायलेकांची ही जोडी फारच भन्नाट आहे.

6 वर्षांपूर्वी सुरू झाली होती या गोष्टीला सुरुवात 

मॅचिंग कपडे वेअर करण्याची सुरुवात या दोघांनी जवळपास 6 वर्षांपूर्वी केली होती. या जोडीने पहिल्यांदा जेव्हा सेम आउटफिट्समधील फोटो इन्स्टाग्रामवर टाकला होता त्यावेळी अनेकांनी या फोटोला पसंती दिली होती. त्यानंतर या मायलेकांनी सेन आउटफिट्स वेअर करण्याचा ट्रेन्डच सुरू केला. दोघंही सोशल मीडियावर आपल्या या अनोख्या फॅडमुळे प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. 

इन्स्टाग्रामवर 1 लाखआपेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत

फॅशन फ्रिक आणि बरेच दिवस 'हाय!' मॅगझिनचे एडिटर असलेल्या पाथ्रापोल यांना अजिबात अंदाज नव्हता की, त्यांच्या या छोट्याशा कल्पनेला लोक एवढी पसंती देतील. या दोन्ही मायलेकांचं इंस्टाग्राम पेज @peepy_and_mother-lee ला जवळपास 1.3 लाख फॉलोअर्स आहेत. फॅशन वर्ल्डमध्ये या मायलेकांच्या जोडीला सर्वात स्टायलिश जोडी मानलं जातं. 

मूड होतो तेव्हाच काढतात फोटो

पाथ्रापोल आणि त्याची आई ली यांचे फोटो पाहून तुम्हाला असं वाटत असेल की, हे दोघेही आपल्या स्टायलिंग आणि आउटफिट्स सिलेक्शनमध्येच अर्धावेळ खर्च करतात. तर तुमचा हा गैरसमज आहे. बँकॉकमधील एका मेन्शनमध्ये राहणारी ही मायलेकांची जोडी आपल्या मूडनुसार सर्व करते. त्यांच्या फॅशन कलेक्शनमध्ये जे काही आहे ते कस्टम फिट आणि पाथ्रापोल यांच्या आवडीचं आहे. 

मुलापेक्षा आईला आवडतात फॅन्सी आउटफिट्स 

पाथ्रापोल असं सांगतो की, आम्ही कधी फोटोशूट प्लॅन करत नाही. हे अगदी सहज आणि आमच्या मूडवर अवलंबून असतं. जेव्हा इच्छा असते तेव्हाच आम्ही फोटोशूट करतो. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, फॅशन मॅगझिनसोबतच्या 14 वर्षांच्या करियर व्यतिरिक्त पाथ्रापोल आणि त्याच्या कुटुबियांना त्यांच्या फॅनफॉलोइंगबाबत काहीच देणंघेणं नाही. त्यांची आई ली हिला आधीपासूनच फॅशनची अत्यंत आवड होती. 

मीडिया एक्सपोजरशी काहीही देणंघेणं नाही

इन्स्टाग्रामवर आई-वडिलांच्या या जोडीची आणखी एक खास गोष्ट म्हणजे, दोघांनाही मीडियाशी काहीही घेणंदेणं नाही. 6 वर्षांमध्ये त्यांनी फक्त एका इंटरनॅशनल पब्लिकेशनला इंटरव्यू दिला आहे. ली असं सांगतात की, 'आम्हाला फॅशन आवडते आणि आम्ही ती फक्त एन्जॉय करतो'

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामfashionफॅशन