एका माकडामुळे संपूर्ण देश अंधारात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 17:47 IST2016-06-09T12:17:25+5:302016-06-09T17:47:25+5:30
एका माकडामुळे वीज गुल झाल्याने केनिया हा संपूर्ण देश अंधारात गेल्याची माहिती, केनजेन वीज कंपनीने दिली आहे.

एका माकडामुळे संपूर्ण देश अंधारात
ए ा माकडामुळे वीज गुल झाल्याने केनिया हा संपूर्ण देश अंधारात गेल्याची माहिती, केनजेन वीज कंपनीने दिली आहे.
देशातील प्रमुख गिटारु संयंत्राच्या ट्रान्सफार्मरवर जंगली माकड अचानक पडले. त्यामुळे ही वीज गेली. १८० मेगावॅट क्षमतेने होणारा वीजपुरवठा थांबला आणि संपूर्ण केनियामध्ये अंधार झाला. केनियाची राजधानी नैरुबीपासून १६० किलोमीटर अंतरावर असलेल्या गिटारू संयत्रात ही घटना घडली. गिटारु हे केनियामधील सर्वात मोठं संयंत्र आहे.
या प्रकारामुळे ट्रान्सफार्मरमध्ये तांत्रिक बिघाड होऊन संपूर्ण देशातील वीज तब्बल ४ तास गायब झाली होती.
या घटनेनंतर माकडाचा जीव वाचवण्यात आला. केनिया वन्यजीव विभागाकडून या माकडावर उपचार सुरू आहेत.