'क्षणभराच्या' मिस कोलंबियाने केले मन मोकळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 14:53 IST2016-01-16T01:08:13+5:302016-02-05T14:53:48+5:30

मिस कोलंबिया एरियाडना ग्युटिअरेझ हिला चुकून मिस युनिव्हर्स २0१५ घोषित करण्यात आले होते.

'Momentous' Miss Colombia made the mind open | 'क्षणभराच्या' मिस कोलंबियाने केले मन मोकळे

'क्षणभराच्या' मिस कोलंबियाने केले मन मोकळे

स कोलंबिया एरियाडना ग्युटिअरेझ हिला चुकून मिस युनिव्हर्स २0१५ घोषित करण्यात आले होते. सूत्रसंचालक स्टीव्ह हार्वे यांनी चुकून तिला विजेती घोषित केले होते. तिचा आनंद औटघटकेचा ठरला. यातून ती आता सावरली आहे. इस्टाग्राम पेजवर तिने आपले मन मोकळे केले आहे.

ती म्हणाली, वादळानंतर सर्व काही शांत होत असते. मला धीर देणार्‍यांचे, पाठिंबा देऊन आधार देणार्‍यांचे मी आभार मानते. केवळ एकाच देशातून नव्हे तर विविध देशांमधून मला पाठिंबा देणार्‍या सर्वांचीच मी अतिशय ऋणी आहे. काही क्षण का असेना मी मिस युनिव्हर्स होते, हे क्षण मी आयुष्यात कायम जतन करून ठेवणार आहे.

आपल्याला काय मिळावे अन् काय नाही, हे आधीच लिहून ठेवले असते. माझ्यासाठी जे लिहून ठेवले होते तेच मला मिळाले असेल. मग दु:ख कशाला बाळगायचे? मी माझ्या देशासाठी आनंद देण्याचा प्रयत्न केला, असे ती सांगते.

Ariadna Gutierrez

Web Title: 'Momentous' Miss Colombia made the mind open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.