​नोरिस दाम्पत्याच्या आयुष्यात आनंदाचा क्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2016 18:56 IST2016-05-15T13:26:12+5:302016-05-15T18:56:12+5:30

नोरिस दाम्पत्याला आता कन्यारत्न झाले आहे.

The moment of happiness in Norris's life | ​नोरिस दाम्पत्याच्या आयुष्यात आनंदाचा क्षण

​नोरिस दाम्पत्याच्या आयुष्यात आनंदाचा क्षण

न वर्षांपूर्वी एका आॅस्ट्रेलियन जोडप्यावर असे संकट कोसळले की, त्यातून सावरणे अवघड झाले.

मस्लिन आणि मराईट नॉरिस या जोडप्याने आपली तीन मुलं दोन वर्षापूर्वी युक्रेनच्या हवाईसीमेत मिसाईल हल्ल्यात पाडलेल्या मलेशिय एअरलाईन्स विमानाच्या दुर्घटनेत गमावली.

गेली दोन वर्षे कमालीच्या दु:खात घालवलेल्या या जोडप्याच्या आयुष्यात अखेर आनंदाचा एक क्षण आला.

नोरिस दाम्पत्याला आता कन्यारत्न झाले आहे. ‘व्हायलेट’ नावाची ही लेक आमच्या तीन मुलांची आम्हाला भेट आहे. तिच्या आगमनासोबतच आमच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद, पे्रम, सुख आणि जीवनाची आशा निर्माण झाली आहे, असे ते सांगताहेत.

noris

गेली दोन वर्षे जणू ते नरकात राहत होते. मो (12), एव्हि (10) आणि ओटिस (8) ही त्यांची मुलं आजोबासोबत त्या दुर्दैवी विमानातून प्रवास करत होते. 2014 साली मिसाईल हल्ल्यामुळे ते युक्रेनमध्ये कोसळले होते. 

Web Title: The moment of happiness in Norris's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.