पाकिस्तान हरल्यामुळे मॉडेल कंदील बलोच रडली ढसाढसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2016 21:33 IST
टीम इंडियाने प्रतिस्पर्धी पाकिस्तानला टी-२० वर्ल्ड कप मध्ये धूळ चारल्यानंतर अपयशाने खचलेली पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोच अक्षरसा ढसाढसा रडली.
पाकिस्तान हरल्यामुळे मॉडेल कंदील बलोच रडली ढसाढसा
टीम इंडियाने प्रतिस्पर्धी पाकिस्तानला टी-२० वर्ल्ड कप मध्ये धूळ चारल्यानंतर अपयशाने खचलेली पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोच अक्षरसा ढसाढसा रडली. भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी याच मॉडेलने एक व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यातून सर्वांचे लक्ष वेधले होते. जर टी-२० वर्ल्डकपमधील भारत पाकिस्तान यांच्यात होणाºया मॅचमध्ये पाकिस्तानच्या टीमने भारताचा पराभव केला तर मी शाहिद आणि संपूर्ण टीमसाठी स्ट्रीप डान्स करेल, असे तिने म्हटले होते. यामुळे या सामन्याबरोबरच तिच्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र तिची घोर निराशाच झाली. पाकिस्तानला भारताने धूळ चारल्यामुळे स्ट्रीप डान्स करण्यासाठी उत्सुक असलेली पाकिस्तानी क्विन नाराज झाली आणि चक्क ढसाढसा रडली. एवढेच नव्हे नाहीतर तिने याबाबत फेसबुकवर व्हिडिओदेखील अपलोड केला आहे, आणि त्यात तिने शहिद आफ्रिदीला सज्जड दम देखील भरला आहे. पाकिस्तानात येऊ नका, तुम्हाला पाकिस्तानी सोडणार नाहीत, असं ती वारंवार सांगताना दिसत आहे.