मिस युनिव्हर्सने केले मिस कोलंबियाचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 07:30 IST2016-01-16T01:07:46+5:302016-02-05T07:30:50+5:30
इन्स्टाग्रावर मांडले मत मिस युनिव्हर्स फिलिपाईन्सची पिया अलोन्झो वर्थबाश हिने मिस कोलंबिया एरियाडना ग्युटिएर्झ हिच्याविषयी सद्भावना व्यक्त केली आहे.

मिस युनिव्हर्सने केले मिस कोलंबियाचे कौतुक
िस युनिव्हर्सच्या स्पर्धेत निकाल जाहीर करताना घोळ झाल्यावर जवळपास आठवड्यानंतर तिने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एरियाडना हिला उद्देशून तिने म्हटले की, तू एक विलक्षण स्त्री आहेस आणि आता आपण कायमच्या एकत्र आल्या आहोत. मागील तीन आठवडे आपण एकत्र होतो. तू मनाने किती बळकट आणि सुंदर आहेस हे मी अनुभवले आहे. तू तुझ्या देशाचे प्रतिनिधीत्व केलेस. प्रत्येक देशवासीयांना तुझा अभिमान आहे. दैवाची तुझ्यासाठी नक्कीच काही योजना असेल. मी त्यासाठी उत्सुक आहे. तुझ्या आयुष्यात नक्कीच काही अद्भुत घडणार आहे. हा वाद यापुढे चर्चिला जाऊ नये. यावर आता याला पूर्णविराम द्यावा, असेही वर्थबाश हिने म्हटले आहे.