मिरांडाची ‘गर्ल्स नाईट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 10:46 IST2016-01-16T01:12:38+5:302016-02-07T10:46:35+5:30

संगीत क्षेत्रात वादग्रस्त ठरलेल्या मिरांडा लॅँबर्ट हिने ब...

Miranda's Girls' Night | मिरांडाची ‘गर्ल्स नाईट’

मिरांडाची ‘गर्ल्स नाईट’

गीत क्षेत्रात वादग्रस्त ठरलेल्या मिरांडा लॅँबर्ट हिने ब्लॅक शेल्टन याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर कॅनेडीयन लेखिका शानिया ट्वेन हिच्याबरोबर 'गर्ल्स नाईट' सेलिब्रेट केली. एका युएस साप्ताहिकाच्या वृत्तानुसार 'रॉक दिस कंट्री टूर' या शोनंतर मिरांडा थेट ट्वेन हिच्या घरी गेली. तेथून दोघीही गर्ल्स नाईट कार्यक्रमात पोहोचल्या. ट्वेनने याबाबतचे काही फोटोज् इंस्टाग्रामवर शेअर केले. 'ब्रिग मी डाऊन' या हिट गाण्यानंतर मिरांडा प्रसिद्धीच्या झोतात आली.

फिल्म मेकिंगचे स्वप्न
गायिका एवरिल लॅविग्न सध्या चित्रपट निर्मितीत नशीब आजमावत आहे. एवरिल 'कॉम्प्लिकेटेड' या अल्बममुळे घराघरात पोहचली. 'क्रिसमस हॉरर कॉमेडी' या शोमध्ये काम केल्यानेच फिल्म मेकिंगची प्रेरणा मिळाल्याचे ती सांगते. मात्र त्याअगोदर ती इटलीला स्थायिक होण्याचे स्वप्न बघत आहे. त्याठिकाणीच माझे भविष्य असून, तेथून वेगळ्या करिअरला मी सुरुवात करणार असल्याचे ती सांगते.

ऊफ.. ये हवा
पॉपस्टार बेयोंसे नॉल्स हिची अचानक आलेल्या हवेच्या झोत्यामुळे चांगलीच पंचाईत झाली. नवरा रॅपर जे आणि तीन वर्षाची मुलगी ब्लू आइवी यांच्यासोबत ती हैंपटंस येथे जात होती. जेंव्हा ती कारमधून बाहेर आली, तेंव्हा अचानक आलेल्या हवेच्या झोत्यामुळे तीचा अंगावरील ड्रेस उडून गेला. मात्र यामुळे ती घाबरली नाही. तिने लगेचच सावरासावर करीत पुन्हा कपडे परिधान केले. यासाठी तिचा नवरा रॅपर हा तीच्या मदतीला धावून आला आणि तिघेही पुढील प्रवासाला मार्गस्थ झाले.

Web Title: Miranda's Girls' Night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.