पुरुषांना ‘सिगारेट’ची ओढ अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2016 22:17 IST2016-04-22T16:47:22+5:302016-04-22T22:17:22+5:30

एक संशोधनात असे दिसून आले की, तंबाखूचे व्यसन हे पुरुषांमध्ये अधिक आहे.

Men want more of 'cigarette' | पुरुषांना ‘सिगारेट’ची ओढ अधिक

पुरुषांना ‘सिगारेट’ची ओढ अधिक

म्रपानाचे व्यसन स्त्री आणि पुरुष दोघांंनाही असते. मात्र, महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये सिगारेट ओढण्याचे प्रमाण अधिक आहे. शिकारी जमातींत धुम्रपान करण्यामध्ये स्त्री-पुरुषांचे प्रमाण कसे आहे हे जाणून घेण्यासाठी केलेल्या एक संशोधनात असे दिसून आले की, तंबाखूचे व्यसन हे पुरुषांमध्ये अधिक आहे.

वॉशिंग्टन स्टेट विद्यापीठातील मानववंशशास्त्रज्ञ केसी रौलेट यांनी सांगितले की, आदिवासी जमातींमध्येदेखील पुरुषांमध्येच धुम्रपान करण्याची सवय अधिक आहे. पश्चिम आफ्रिकेतील अका पिग्मी जमातीचे आम्ही सर्वेक्षण केले.

सर्वेक्षणात दिसून आले की, केवळ 5 टक्के महिला धुम्रपान करतात तर 94 टक्के  पुरुषांना हे व्यसन आहे. ही आकडेवारी यामुळे देखील आश्यर्चकारक आहे कारण, अका जमातीतील पुरुष करत असलेल्या कामाच्या मोबदल्यात एक सिगारेटचे पॉकेट विकत घेणे अवघड आहे.

यावरून हे स्पष्ट होते की, तंबाखू महिलांपेक्षा पुरुषांना जास्त प्रिय आहे. तसे पाहिले गेले तर महिलांवर तंबाखूचे व्यसने करण्यावर काही बंधन नाही परंतु, पोटातील बाळाला यामुळे बाधा होते म्हणून त्या असे करणे टाळतात.

Web Title: Men want more of 'cigarette'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.