अमेरिकेतील पुरुषांनाही वाटते बायकांनीच करावे घरकाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2016 20:39 IST2016-08-25T15:07:07+5:302016-08-25T20:39:39+5:30
एकविसाव्या शतकातही तेथील पुरुषांना वाटते की, बायकांनीच घरातील कामे आणि मुलांकडे लक्ष द्यावे.
.jpg)
अमेरिकेतील पुरुषांनाही वाटते बायकांनीच करावे घरकाम
स वत:ला प्रगत देश म्हणणाऱ्या अमेरिकेतसुद्धा प्राचीन काळापासून चालत आलेला प्रचलित समज आजही कायम आहे. एकविसाव्या शतकातही तेथील पुरुषांना वाटते की, बायकांनीच घरातील कामे आणि मुलांकडे लक्ष द्यावे. पुरोगामी, आधुनिक आणि जेंडर इक्वॅलिटीच्या गोष्टी करणाऱ्या तेथील अनेक पुढाऱ्यांना हे तथ्य हादरून टाकणारे आहे.
अमेरिकेत करण्यात आलेल्या एका संशोधनात असे दिसून आले की, पती-पत्नीच्या वैयक्तिक कमाईवरून नाही तर त्यांच्या जेंडरवरून घरकामाची जाबाबदारी टाकण्यात येते. म्हणजे पुरुषांना आजही पारंपरिक पद्धतीनुसार घरकामांची जबाबदारी महिलांचीच असते असे वाटते. अमेरिकन सोशिओलॉजिकल असोसिएशनच्या (एएसए) अकराव्या वार्षिक बैठकीमध्ये सादर करण्यात आलेल्या शोधनिबंधात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
यामध्ये अमेरिकेतील भिन्नलिंगी आणि समलिंगी जोडपे ‘घरकामाची जबाबदारी कोणाची’ याविषयी काय विचार करतात हे जाणून घेण्यासाठी इंडियाना विद्यापीठातील संशोधकांनी अध्ययन केले. त्यानुसार सहभागी झालेल्या सुमारे ७५ टक्के पुरुषांना वाटते की, स्वयंपाक, धुणी-भांडी, सफाई, बाजार करणे यासारखी कामे महिलांचीच आहेत.
९० टक्के पुरुषांनी सांगितले की, घराबाहेरची कामे ही पुरुषांची आहेत. म्हणजे व्यक्तीच्या आवडीनिवडी, मिळकत यापेक्षा त्याच्या जेंडरवरून अशी कामांची विभागणी केली जाते.