'तुझ मे रब दिखता है'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 10:43 IST2016-01-16T01:18:41+5:302016-02-07T10:43:12+5:30
यू-ट्यूबवर सध्या एक व्हिडिओ बराच गाजत आहे.

'तुझ मे रब दिखता है'
य -ट्यूबवर सध्या एक व्हिडिओ बराच गाजत आहे. ज्यात एक ब्राझिलीयन युवक शाहरुख खानच्या 'रब ने बना दी जोडी' यातील गाणी म्हणताना दिसतो. मार्कोस युवरी हा ब्राझिल सालवाडोअर या शहरातील युवक आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की या शहरातील भारतीयांना हे माहीत नाही की इथेही बॉलिवूडचा खरा चाहता आहे. त्याला हिंदी बोलताच येत नाही. तरीसुद्धा तो बॉलिवूडमधील अनेक गाजलेली गाणी म्हणतो. त्याच्या म्हणण्यानुसार 'तुझ मे रब दिखता है' हे गाणं त्याचे आवडते आहे आणि तेच तो उत्कृष्ट म्हणू शकतो.त्याचे भारतावर इतके प्रेम आहे की, बॉलिवूडचे गाणे म्हणताना तो भारतीय पोशाखच घालत असतो. त्याच्या मते ही त्याने भारताला आणि भारतीयांना दिलेली सलामी आहे. दुसरे रहस्य असे की, तो शाहरुख खानचा प्रचंड चाहता आहे.