उंदीर मामांची कमाल, विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2016 05:38 IST2016-02-27T12:38:16+5:302016-02-27T05:38:16+5:30
चीनमधील एका विमानात उंदीर शिरल्यामुळे जेथून उड्डाण केले तेथेच विमानाला आपत्कालिन लँडिग करावे लागले.
.jpg)
उंदीर मामांची कमाल, विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
‘ ूर्ती लहान पण कीर्ति महान’ याचे जिवंत उदाहरण म्हणजे उंदीर. गणरायाचे वाहन असणारे उंदीरमामा गणपतीसारखेच खट्याळ आहेत. त्यांच्या खट्याळपणाचा एका विमानकंपनीला चांगलाच अनुभव आला.
चीनमधील एका विमानात उंदीर शिरल्यामुळे जेथून उड्डाण केले तेथेच विमानाला आपत्कालिन लँडिग करावे लागले. ‘लंूग एअर’ कंपनीच्या विमानाने झेजियांग प्रांताची राजधानी हँगझोऊ येथून सकाळी ७ वाजता टेक आॅफ केले. पण उड्डाणाच्या काही काळानंतरच कॅबिनमध्ये उंदीर दिसला. लगेच विमानाला परत हँगझोऊ विमानतळावर उतरावे लागले.
एअरलाईन कंपनीने सांगितले की, तो पाळीव उंदीर नव्हता. तो विमानात आला कसा याची आम्ही चौकशी करत आहोत. बहुधा केटरिंग व्हॅन्समधून तो आत आला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
![faªf]()
उंदीर इलेक्ट्रिक वायर कुरतूडण्यासाठी कूप्रसिद्ध आहेत. त्यामुळे विमानाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.