मारियाचे ब्रसेल्समधील प्रोग्रॅम रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 12:33 IST2016-03-27T19:33:46+5:302016-03-27T12:33:46+5:30
बेल्जियमच्या ब्रसेल्समध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर गायिका मारिया केरीने सुरक्षा कारणास्तव शहरातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

मारियाचे ब्रसेल्समधील प्रोग्रॅम रद्द
ब ल्जियमच्या ब्रसेल्समध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर गायिका मारिया केरीने सुरक्षा कारणास्तव शहरातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. गेल्या मंगळवारी ब्रसेल्समध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यात ३१ लोकांचा मृत्यू तर ३०० पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. मारियाने याबाबत ट्विटरवर पोस्ट शेअर केली असून, त्यामध्ये सुरक्षेमुळे रविवारी फॉरेस्ट नॅशनल येथे होणार कार्यक्रम रद्द केल्याचे सांगितले आहे. ब्रसेल्समधील मी माझ्या सर्व फॅन्सवर प्रचंड प्रेम करते. मात्र माझ्या बॅँडमधील सर्व साथीदारांच्या सुरक्षेच्या कारणास्तवच मी आगामी कार्यक्रम रद्द केले आहेत.