शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

मानसी आणि जुईचे कुर्ते आणि झुमके, का होताहेत इतके फेमस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 1:17 PM

मराठी मालिकेतल्या मानसी आणि जुईनं कुर्तीजमध्ये आणलीय नवीन फॅशन. फ्रॉक स्टाइल आणि नेव्ही ब्ल्यू कुर्तींचा फॅशनच्या जगात बोलबाला!

ठळक मुद्दे* मानसीनं फ्रॉक स्टाइल कुर्ती आणि टी कट कुर्तीची फॅशन आणली.* जुईनं आणलेली नेव्ही ब्ल्यू कुर्ती तरूणींप्रमाणेच पौढ महिलांवरही उठून दिसते.* नेव्ही ब्ल्यू कुर्ती आणि केशरी लेगिन्स या फॅशनची सध्या चलती.* कुर्तीजसोबतच त्यांनी आणलेले आॅक्सडाइज्ड झुमके आणि जयपुरी झोलाही एकदम हिट.

सारिका पूरकर-गुजराथीचित्रपटातील नायिकांच्या फॅशनपेक्षा मालिकांमधील नायिकांची फॅशन आता सर्वसामान्यांपर्यंत लवकर पोहोचू लागल्यामुळे पुन्हा एकदा टीव्ही नायिकांनी पुन्हा फॅशनच्या दुनियेत बाजी मारली आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे ‘खुलता कळी खुलेना’मधील नायिका मानसी आणि ‘अस्सं सासर सुरेख बाई ’ मधील जुई या दोघीही महिलांच्या फॅशन विश्वातही लोकप्रिय नायिका ठरल्या आहेत. कारण या दोघींनी या मालिकांमध्ये घातलेले ड्रेसेस आजचा स्टाईल ट्रेण्ड बनला आहे.

 

 

मानसीची फ्रॉक कुर्ती

‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतील सुरूवातीच्या काही भागात मानसी अनारकली, फ्रॉक स्टाईल कुर्तीमध्ये दिसली होती. कॉटनच्या, भरपूर घेर असलेल्या आणि थ्री फोर्थ स्लीव्हजच्या या कुर्ती त्यामुळे बाजारात ‘मानसी कुती’र् म्हणूनच हिट झाल्या होत्या. अजूनही या कुर्तीज युवतींमध्ये लोकप्रिय आहेत. निळा, काळा, पोपटी, लाल या रंगातील ब्लॉक प्रिंट डिझाईन असलेल्या या कुर्तीज आजही मार्केट कॅप्चर करून आहेत. तसेच याच मालिकेत आता मानसी नव्या ड्रेसिंग स्टाईलमध्ये अवतरली आहे. तिचा हा फॅशन फंडाही युवतींनी तितकाच उचलून धरला आहे. सध्या मानसीची ‘टु कट कुर्ती’ परंतु त्या कटवर वेगळ्या रंगाच्या, वेगळ्या डिझाईनचा पॅच असलेली आणि त्यालाच जोडून साईडला गोंड्यांची लटकन असलेली कुर्ती खूपच हिट झाली आहे. त्यामुळे टू कट परंतु साईड पॅक अशी ही कुर्ती पलाझो, पायजमा सलवारवर खूप पसंत केली जात आहे.

 

जुईची नेव्ही ब्ल्यू कुर्तीअस्सं सासर सुरेख बाईमधील जुई ही मालिकेत अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबाची सून म्हणून वावरताना खूप स्टाईलबाज दाखवलेली नसली तरी तिच्या सोबर लूक देणाºया, दिसायलाही सुंदर अशा कुर्तीज मात्र हिट झाल्या आहेत. मालिकेत जुईनं घातलेली नेव्ही ब्ल्यू रंगाची कुर्ती प्रचंड हिट झाली आहे. बाजारात सर्वत्र नेव्ही ब्ल्यूच्या निळाईची जादू दिसतेय. नेव्ही ब्ल्यू कुर्तीच्या गळ्यावर, थ्री फोर्थ स्लीव्हजवर आणि कुर्तीच्या बार्डर्सवर केशरी आणि गुलाबी रंगातील नाजूक भरतकाम, आरसेकाम असलेल्या या कुर्तीज युवतींसाठीच नाही तर प्रौढ महिलांसाठीही सुटेबल ठरल्या आहेत. या कुर्तीज नवे रंग, लेगिन्स आणि कुर्तीचे नवे कॉम्बिनेशन घेऊन आल्याय. नेव्ही ब्ल्यू कुर्ती आणि केशरी लेगिन्स हे कॉम्बिनेशन जुईमुळे जबरदस्त हिट झालं आहे.

 

 

 

आॅक्सडाइज्ड झुमके 

हे झुमके लोकप्रिय करण्याचे क्रेडिटही ‘खुलता कळी खुलेना’ची मानसी हिलाच द्यावं लागेल. परंतु तिच्याबरोबरच ‘काहे दिया परदेस’ मधील गौरीलाही हे क्रेडिट जातं. या दोघींनीही मालिकेच्या सुरूवातीस मोठ्या आकारातील आॅक्सडाईज्ड झुमके कॅरी केले होते. हे झुमके देखील एक स्टाईल आणि फॅशन फंडा म्हणून अफलातून हिट झाले आहेत. कुर्तीजवर, अनारकली ड्रेसवर हे झुमके खूप शोभून दिसत असल्यामुळे या झुमक्यांचे असंख्य प्रकार बाजारात उपलब्ध झाले आहेत.

 

जयपुरी झोलाजयपुरी बटवा लोकप्रिय करण्यात पुन्हा एकदा ‘खुलता कळी खुलेना’ आणि मानसीचे कनेक्शन आहे . सध्या जयपुरी भरतकाम, आरसेकाम केलेले, छान गोंडे लावलेल्या बॅग्ज, पर्स , क्रॉस बॅग्ज, वॉलेट, मिनी पर्स खूप हिट झाले आहेत. अर्धवर्तुळाकार, आयताकृती या आकारातील या बॅग्ज मानसीनं ‘खुलता कळी खुलेना’या मालिकेत काही भागात खांद्यावर मिरवल्या होत्या. त्यापूर्वी ‘नांदा सौख्य भरे’ मालिकेतही स्वानंदीनं या बॅग्ज वापरल्या होत्या. त्यामुळे एरवी प्युअर लेदर, डेनिमसारख्या मटेरियल्सच्या पर्सेससाठी आग्रह धरणाºया युवतीदेखील या जयपुरी झोल्यांच्या प्रेमात पडल्या आहेत.