​पुरुष मित्रांनो! होऊन जाऊ द्या थोडं ‘कथ्थक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 19:13 IST2016-06-18T13:43:29+5:302016-06-18T19:13:29+5:30

अपर्णा मिश्रा रविवारी (ता. १९) मुंबईतील (एनसीपीए) येथे खास पुरुषांसाठी कथ्थक कार्यशाळा घेणार आहेत.

Male friends! Let's go and do some 'Kathak' | ​पुरुष मित्रांनो! होऊन जाऊ द्या थोडं ‘कथ्थक’

​पुरुष मित्रांनो! होऊन जाऊ द्या थोडं ‘कथ्थक’

थ्थक’ म्हटल्यावर लगेच तुमचे कान टवकारले असतील. पुरुष आणि कथ्थक? शक्यच नाही असे भाव चेहऱ्यावरही आले असतील.

कारण काय आहे ना, शास्त्रीय नृत्य आणि खास करून कथ्थक म्हटले की ते केवळ मुलींनीच करावे असा गैरसमज प्रचलित आहे. पण हे कोणी ठरवले की, कथ्थक केवळ मुलींनीच करावे?

हाच गैरसमज दूर करण्यासाठी प्रसिद्ध नृत्यगुरू अपर्णा मिश्रा रविवारी (ता. १९) मुंबईतील नॅशनल थिएटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) येथे खास पुरुषांसाठी कथ्थक कार्यशाळा घेणार आहेत.

‘कथ्थक फॉर हिम’ असे या कार्यशाळेचे नाव असून यासंबंधी बोलताना त्या सांगतात की, कथ्थकमध्ये नृत्यातून कथा सांगितली जाते. आपल्या भावना व्यक्त केल्या जातात. त्या व्यक्त करण्यासाठी ‘स्त्री’च असावे लागते असे नाही. हसणं, रडणं, लाजणं, मन मोकळं करणं यासाठी लिंगभेद करू नये. या कार्यशाळेतून हेच सांगण्याचा, पटवून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. 

गेली सोळा वर्षे त्या कथ्थक शिकवत आहेत. आतापर्यंत तीन हजारांपेक्षा जास्त मुलामुलींना त्यांनी कथ्थक शिकवले. रविवारी ‘फादर्स डे’चे निमित्त साधून त्यांनी हे वर्कशॉप आयोजित केले आहे.

त्यामध्ये पुरुषांसाठी असणारे विशेष ताल, भाव, बोल, शैली यांचा सामावेश केला जाणार. पुरुष हे गणितीयपद्धतीने विचार करणारे असतात. त्यामुळे कार्यशाळेत याच आधारावर पुरुषांना कथ्थक शिकवले जाणार. दैनंदिन घटना, कार्यक्रम, गोष्टींना कार्यशाळेत नृत्यातून दर्शविण्यात येणार आहे.

निसर्गाने स्त्री-पुरुषांना भिन्न बनवले आहे. पण याचा अर्थ असा नाही की, कोणी एक दुसºयापेक्षा श्रेष्ठ आहे. दोघे एकमेकांना पुरक आहेत. दोघांची बलस्थाने, भावनांचे पदर, विचारांची भिन्नता या कार्यशाळेत नृत्यातून अधोरेखीत केली जाणार आहे. ‘पुरुषांसाठी आपल्या रुटिनमधून काहीसं वेगळं आणि मनाला टवटवित करणारा अनुभव घेण्याची संधी ‘कथ्थक फॉर हिम’द्वारे मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली.

तर मग विचार कसला करताय? होऊन जाऊ द्यायचे का थोडं कथ्थक.
 

Web Title: Male friends! Let's go and do some 'Kathak'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.