आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी करिश्मा तन्ना काही दिवसांपूर्वी नियॉन ब्लेजर शॉर्ट्समध्ये दिसून आली. करिश्मासारखाच सेम ड्रेस मलायका अरोराने काही दिवसांपूर्वी वेअर केला होता. आज आपण जाणून घेऊया दोघींपैकी कोणाचा लूक सर्वात भारी होता. 

करिश्मा तन्ना...करिश्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंचवर काही फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये ती नियॉन कलरचा ब्लेजर आणि शॉर्ट्समध्ये दिसून आली होती. करिश्माचे फोटो बुल्गेरियाचे असून तिथे ती खतरो के खिलाडीच्या शूटिंगसाठी गेल्याचे सांगण्यात येत आहे. करिश्मा ने नियॉन शॉर्ट्स आणि त्याच कलरच्या ब्लेझरसोबत नियॉन स्पोर्ट्स ब्रा वेअर केली होती. तसेच तिने ब्लेजरचे स्लीव्स फोल्ड केले होते. ज्यामुळे तिला स्पोर्टी लूक मिळत होता. करिश्माने ब्लॅक गॉगल्स वेअर केले होते आणि केस मोकळे सोडले होते. नियॉन कलरला बॅलेन्स करण्यासाठी तिने न्यूड मेकअप केला होता आणि त्यासोबत ग्रे स्नीकर्स वेअर केले होते. 

मलायका अरोरा... मलायकाने ओवर साइज्ड ब्लेजरसोबत बस्टियर टॉप वेअर केला होता. तिचा लूक आणखी खास करत होते तिचे सनग्लासेस आणि व्हाइट स्नीकर्स. मलायकानेही लाइट मेकअपला प्राधान्य दिलं होतं. तसेच तिने केसांचा बन बांधला होता. 

तुम्हीही कॅरी करू शकता हा लूक... सध्या ब्लेझर शॉर्ट्स ट्रेंडिंगमध्ये आहेत. तुम्ही ब्लेझर ऑफिसमध्येच नाहीतर ब्रंच, आउटिंग आणि नाइट आउटसाठी वेअर करू शकता. तसेच तुम्ही सेम कलर वेअर करण्याऐवजी आतमध्ये प्रिंटेड कलर्स वेअर करू शकता. 


Web Title: Malaika Arora or Karishma tanna whos blazer shorts look is classy and hot
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.