होळकर-गोदरेज विवाहासाठी महेश्वर राजवाडा सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 14:16 IST2016-01-16T01:07:34+5:302016-02-05T14:16:15+5:30
दोघेही लहानपणापासूनचे मित्र मध्य प्रदेशमधील खारगाव जिल्ह्यातील महेश्वर येथील होळकरांचा राजवाडा एका मोठय़ा विवाहसोहळ्य़ासाठी सजला आहे

होळकर-गोदरेज विवाहासाठी महेश्वर राजवाडा सज्ज
श वाजीराव होळकर यांचे पुत्र यशवंत आणि प्रसिद्ध उद्योजक विजयकृष्ण गोदरेज यांची कन्या नैरिका यांचा हा विवाह नैरिका ही वकील आहे, तर यशवंतचा गोव्यात उद्योगव्यवसाय आहे. हे दोघेही लहानपणापासूनचे मित्र आहेत. इंदोर संस्थानचे संस्थानिक होळकर घराण्याचे शिवाजीराव होळकर हे वंशज आहेत. शालिनीदेवी त्यांच्या पत्नी आहेत. इंदोरपासून १00 किलोमीटरवर असलेल्या महेश्वरला होळकरांनी राजधानी केले होते. विजयकृष्ण गोदरेज हे लॉकिम मोटर्स ग्रुपचे संचालक आहेत. त्यांची पत्नी स्मिता गोदरेज उद्योगसमूहाचे अध्यक्ष आदि गोदरेज यांची बहीण आहे. महेश्वरचा किल्ला तीन कलाकारांनी खास होळकर यांच्या काळातील शैलीत सजवला आहे. त्यासाठी इंदोरआणि महाराष्ट्रातून फुले मागविण्यात आली आहेत. नर्मदेच्या तीरावर मारवाडी शैलीतले तंबू उभारले आहेत. त्यात लक्झरी हॉटेलसारख्या सोयी-सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.