मॅड्रिड झाले बॉलिवूडमय!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 22:28 IST2016-06-25T16:55:55+5:302016-06-25T22:28:12+5:30
१७वा आयफा अवार्ड सोहळा सध्या स्पेनची राजधानी मॅड्रिडमध्ये रंगलेला आहे. या सोहळ्याने संपूर्ण मॅड्रिड शहर जणू बॉलिवूडमय झालेय.

मॅड्रिड झाले बॉलिवूडमय!!
१ वा आयफा अवार्ड सोहळा सध्या स्पेनची राजधानी मॅड्रिडमध्ये रंगलेला आहे. या सोहळ्याने संपूर्ण मॅड्रिड शहर जणू बॉलिवूडमय झालेय. मॅड्रिडच्या रस्त्यांवर, मॉलमध्ये आणि हॉटेलात बॉलिवूड स्टारची चहलपहल दिसते आहे. साहजिकच येथील भारतीय वंशाच्या लोकांसाठी ही मोठी पर्वणी आहे. आपल्या आवडत्या कलाकारांना पाहण्याची,त्यांच्याशी सेल्फी घेण्यासाठी मॅड्रिडमधील भारतीय उतावीळ आहे. आज दीया मिर्झा व रिचा चड्ढा एका हॉटेलात डिनर करताना दिसले. तर प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी मॅड्रिडच्या रस्त्यांवर निवांत फिरतांना दिसले. यामुळे येथील भारतीयांना आपल्या कलाकारांना पाहण्याची, त्यांची अप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करण्याची जणू संधी मिळाली आहे. मॅड्रिडमधील भारतीय यामुळे जाम खूश आहेत,हे सांगणे नकोच!