मडोना पुन्हा वादात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:13 IST2016-02-07T02:40:35+5:302016-02-07T08:13:13+5:30
नुकतेच मडोनाने चीनमध्ये सादरीकरण करताना तायवानचा राष्ट्रध्वज आपल्या खांद्यावर घेतला होता

मडोना पुन्हा वादात
म ोना पुन्हा वादात
पॉप गायिका मडोना हिचे वादाशी नातेच आहे की काय असे वाटायला लागले आहे. नुकतेच मडोनाने चीनमध्ये सादरीकरण करताना तायवानचा राष्ट्रध्वज आपल्या खांद्यावर घेतला होता. मडोना तायवानच्या स्वातंत्र्याचा पक्ष घेतला असल्याचा आरोप लावण्यात येत आहे. मडोनाच्या या सादरीकरणाचे फोटो तायवानच्या दोन मोठ्या दैनिकांनी प्रसिद्ध केल्याने या वादाला हवा मिळाली आहे. मडोना सध्या रिबेल हार्ट टूरवर असून त्याचाच एक भाग म्हणून तायवानमध्ये सादरीकरण करण्यात आले होते. प्रत्येकाला असलेल्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याचा संदेश यातून देण्यात येत असल्याने मडोनाचा हे सादरीकरण वादात सापडले असल्याचे सांगण्यात येत आहे. मडोनाच्या या कृत्याने जगभरातून तायवानच्या स्वातंत्र्याचा पक्ष घेणारे समोर आले आहेत.