शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

माधुरी दीक्षित: तिच्याकडून शिकाव्यात अशा 5 प्रोफेशनल गोष्टी

By admin | Published: May 15, 2017 4:18 PM

माधुरी दीक्षित नावाचा ब्रॅण्ड सांगतो यशाचे ५ मंत्र

- अनन्या भारद्वाजमाधुरी दीक्षितचा आज 50 वा वाढदिवस. माधुरी नावाची अनेकांच्या दिल की सुंदर धडकन आज पन्नाशीची झाली यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. ती आजही तितकीच सुंदर दिसते. तिचं एक स्माईल, तिची एक झलक तिच्या करिअरच्या सुवर्णकाळाची याद करवून देते. तिची ती ‘मोहिनी’ आजही कायम आहे. मात्र माधुरीच्या करिअरकडे, तिच्या वाटचालीकडे पाहून काही गोष्टी नक्की प्रोफेशनल स्किल्स म्हणून शिकायला हव्यात. प्रत्यक्षातली म्हणजेच पर्सनल आयुष्यात माधुरी जगण्याचा कसा विचार करते हे माहिती नसलं तरी तिच्या बॉलिवूडच्या करिअरकडे पाहून काही गोष्टीं सॉफ्ट स्किलसह प्रोफेशनल स्किल्स म्हणून पहायला हव्यात. माधुरीची लाईफस्टाईलही त्या गोष्टी ठळकपणे दाखवते. आजच्या कार्पोरेट करिअरच्या जगात आणि आपलं काम हाच आपला ब्रॅण्ड असं अधोरेखीत करण्याच्या जगात या गोष्टींवर एक नजर घालायला हवी..१) स्माईल प्लीज

माधुरीचं स्माईल ही एक जादू आहे. तसं जादुई स्माईल काही आपल्या साऱ्यांनाच वरदान म्हणून लाभलेलं नाही. मात्र तरीही कामाच्या ठिकाणापासून ते व्यक्तिगत आयुष्यात नातेसंबंध जपण्यापर्यंत हसावं, स्माईल करावं तर ते माधुरीसारखं. मनापासून. मोठ्ठं. थेट. उगीच हसल्यासारख्या करायचं, केलं म्हणून केलं स्माईल, काय करणार एक स्माईल तर द्यायलाच हवं असं उपकार केल्यागत काही लोक हसतात. त्यामुळे आपल्याला वाटत नसलं तरी इतरांना ते आपलं खोटंखोटं हसू कळतंच. आणि त्याचा व्हायचा तो वाईट परिणाम होतोच. म्हणून स्माईल करायचं तर ते सच्चं वाटलं पाहिजे, मनापासून केल्यासारखं हवं. माधुरीसारखं. तिचं स्माईल ही तिची ताकद असेल तर ती ताकद आपली का असू नये? प्रत्येक हसरा चेहरा सुंदरच दिसतो. (धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा 50वा वाढदिवस)२)प्रॅक्टिस द बेस्ट!

माधुरी कथक उत्तम करते. अजूनही शिकतेय. रोज सकाळी अजूनही न चुकता रियाज करते हे सारं आपण वृत्तपत्रात वाचत असतोच. पण त्यापलिकडे त्यात एक गोष्ट दिसते. ती म्हणजे सराव. आपल्याला जे येतं, त्याचा वारंवार सराव. त्याच नृत्यशैलीच्या जोरावर तिनं एक काळ गाजवला. मात्र येतं मला सारं असा अ‍ॅटिट्यूड कधी तिच्या चेहऱ्यावर दिसला नाही. आपलं स्किल अधिकाधिक उत्तम आणि बिनचूक कसं करता येईल याचं हे एक उदाहरण.३) आपलं नाव, आपला ब्रॅण्ड

ज्या टप्प्यावर अनेक मराठी माणसं कमी पडतात तो टप्पा माधुरी ओलांडू शकली, तो म्हणजे तिचं काम, तिचं नाव, हाच तिचा ब्रॅण्ड झाला. तिचे सिनेमे चालो ना चालो, पण तिचा ब्रॅण्ड कायम चालला. त्याची विश्वासार्हता कायम राहिली. ब्रॅण्डचं गुडवील कायम राहिलं. काळ बदलला तरी माधुरी दीक्षित नावाच्या ब्रॅण्डचं कौतूक कायम राहिलं. आपलं काम असा आपला ब्रॅण्ड बनला पाहिजे. आपलं नाव हाच आपला ब्रॅण्ड, तीच आपली ओळख. मग काळ बदला नाही तर कंपनी बदला.४) नो नॉनसेन्स!

तिच्या करिअरच्या काळात तिच्यावर टीका झाली. तिचे करिअरचे निर्णय चुकले. सिनेमे पडले. काय वाट्टेल त्या भूमिका करते म्हणून आरोप झाले. मात्र ती गप्प झाली. ज्याला त्याला उत्तरं देत बसली नाही, तिनं बडबड केली नाही. ती शांतपणे आपलं काम करत राहिली. आजच्या सोशल मीडीयाच्या काळात तर हे आपल्यालाही जमायला हवं. बोलेल ते आपलं काम. उगीच बडबड करत, याच्यात्याच्यावर टीका करत, लोकांच्या भांडणात पडत, आपल्या संदर्भात खुलासे देत बसायचे नाहीत. जे करायचं ते करायचं. शांतपणे. म्हणायचं इथं नॉनसेन्स खपवून घेतला जात नाही.

 ५) कमबॅक स्ट्रगल 

तुम्ही कितीही मोठे स्टार असा, मोठा ब्रॅण्ड असा, तुमचा भूतकाळ कितीही मोठा असो, तुम्हाला वर्तमानात पुन्हा पुन्हा स्वत:ला सिद्ध करावं लागतंच. माधुरीनं कमबॅक केलं तोवर काळ पुढं सरकला होता. टेक्निकल गोष्टीच नाही तर बॉलिवूड सर्वार्थानं पुढं सरकलं होतं. सिनेमाची निवड चुकली तिची. कमबॅक यशस्वी झालं नाही. पण म्हणून ती हरली नाही, ती कमबॅकचे प्रयत्न वेगवेगळ्या टप्प्यातून करतेच आहे. टीव्ही शो, जाहिराती यातून तिचं अस्तित्व तिनं टिकवून धरलं आहे. कमबॅकचा स्ट्रगल कुणालाही चुकत नाही, तो करण्यात चूकही काही नाही, याचं अजून मोठं कुठलं उदाहरण हवं?