‘मॅड मॅक्स : फ्यूरी रोड’ ११ मार्चला भारतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 09:22 IST2016-03-02T16:22:09+5:302016-03-02T09:22:09+5:30
हॉलिवूडपट ‘मॅड मॅक्स: फ्यूरी रोड’ येत्या ११ मार्चला भारतात प्रदर्शित होतो आहे.

‘मॅड मॅक्स : फ्यूरी रोड’ ११ मार्चला भारतात
न कत्याच पार पडलेल्या आॅस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वाधिक पुरस्कारावर नाव कोरणारा हॉलिवूडपट ‘मॅड मॅक्स: फ्यूरी रोड’ येत्या ११ मार्चला भारतात प्रदर्शित होतो आहे. जॉर्ज मिलरच्या या चित्रपटाने आॅस्कर सोहळ्यात संपादन, प्रॉडक्शन डिझाईल, साऊंड एडिटींग, साऊंड मिक्सिंग, कॉस्च्यूम, मेकअप व हेअर स्टाईलसाठी पुरस्कार पटकावले. भारतातील हॉलिवूड चित्रपटप्रेमींसाठी ३ डी आणि आयमॅक्स ३ डी फॉर्मेटमध्ये हा चित्रपट रिलीज होत आहे. टॉम हार्डी, चार्लीज थेरॉन, निकोलस हॉल्ट, हुग केस बेर्ने आदींची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट महिला कैद्यांवर आधारित आहे.