लुलिया : इतक्यात मला लग्नाचा शालू नेसायचाही नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2016 20:04 IST2016-05-22T14:34:56+5:302016-05-22T20:04:56+5:30

बॅालिवूडचा दबंग सलमान खान व लुलिया लग्न करणार असल्याची बातम्या सध्या चर्चेत आहे. यावर सलमानची गर्लफ्रेंड लुलियाने पहिल्यांदाच विधान केलेय.

Lulia: I do not even have a wedding party | लुलिया : इतक्यात मला लग्नाचा शालू नेसायचाही नाही

लुलिया : इतक्यात मला लग्नाचा शालू नेसायचाही नाही

 
ॅालिवूडचा दबंग सलमान खान व लुलिया लग्न करणार असल्याची बातम्या सध्या चर्चेत आहे. यावर सलमानची गर्लफ्रेंड लुलियाने पहिल्यांदाच विधान केलेय.

"डियर फ्रेंड्स, मला कोणत्याही अफवांवर प्रतिक्रिया देणे महत्त्वाचे वाटले नाही
 पण, आता मला असे सांगावसे वाटते की मी कधी लग्नाविषयी काही बोलले नाही आणि इतक्यात मला लग्नाचा शालू नेसायचाही नाही" असे लुलियाने इंन्स्टाग्रामवर पोस्ट केले.

आश्चर्याची गोष्ट अशी की बऱ्याच दिवसांपासून लुलिया आणि सलमानच्या लग्नाच्या अफवा येत होत्या. लुलियाबी सलमानच्या कुटुंबासोबतदेखील मुंबई एयरपोर्टवर दिसली होती.

इतकेच नव्हे तर सलमान आणि लुलिया प्रिती झिंटाच्या रिसेप्शनमध्ये देखील एकत्र होते. त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या चर्चांना अधिकच उधाण आले होते. मात्र आता खुद्द लुलियानेच इतक्यात लग्न कऱणार नसल्याचे स्पष्ट केलेय.

Web Title: Lulia: I do not even have a wedding party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.