लाडक्या कुत्र्याने केला प्रियकराचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 05:03 IST2016-03-02T12:03:53+5:302016-03-02T05:03:53+5:30
लाडक्या पाळीव कुत्र्यानेच प्रियकरावर हल्ला चढवून त्याला जखमी केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
.jpg)
लाडक्या कुत्र्याने केला प्रियकराचा खून
मृत प्रियकराचे नाव लियाम हिविटसन आहे. त्याची प्रेयसी जेसिका हिल हिने ट्रिगर नावाचा कुत्रा पाळला होता. ट्रिगर ‘पीटबुल’ प्रजातीचा कुत्रा आहे. लियामच्या प्रेयसीने सांगितले की त्याच्या मृत्यूने ती पूर्णत: निराशेच्या गर्तेत गेली आहे.
जेसिका म्हणाली, ट्रिगरने लियामला ओरबाडून इजा केली व लियामचा मृत्यू झाला तेव्हा मला काय वाटले याचे मी वर्णन नाही करू शकत. लियामच्या अचानक गेल्याने मला जबर मानसिक धक्का बसला आहे.
लियाम जेसिकाच्या घरी होता. तेव्हा लियामवर ट्रिगरने हल्ला चढवला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र काही तासातच त्याचा मृत्यू झाला. लियामच्या मृत्यूनंतर जेसिका म्हणाली, ‘मी त्याचावर खूप प्रेम करते, मला त्याची फार आठवण येत आहे.’