​ऋषी कपूरचा पून्हा गांधी घराण्यावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 16:45 IST2016-06-09T11:15:47+5:302016-06-09T16:45:47+5:30

राजीव गांधी जीवनदायी योजनेचं नाव बदलून महाराष्ट्र सरकारने चांगलं काम केलंय. सरकारने योग्य वेळी योग्य निर्णय घेतलाय असं म्हणत ऋषी कपूर यांनी पून्हा गांधी घराण्यावर निशाणा साधला आहे.

Look at Rishi Kapoor's Poona Gandhi family | ​ऋषी कपूरचा पून्हा गांधी घराण्यावर निशाणा

​ऋषी कपूरचा पून्हा गांधी घराण्यावर निशाणा

जीव गांधी जीवनदायी योजनेचं नाव बदलून महाराष्ट्र सरकारने चांगलं काम केलंय. सरकारने योग्य वेळी योग्य निर्णय घेतलाय असं म्हणत ऋषी कपूर यांनी पून्हा गांधी घराण्यावर निशाणा साधला आहे. सरकारी योजनांना गांधी घराण्याचं नावावरुन टीका करणारे अभिनेते ऋषी कपूर यांनी पुन्हा एकदा ट्विट करून काँग्रेसजनांचा चिमटा काढलाय.

नुकतेच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नाव बदलून महात्मा फुले जीवनदायी योजना असं करण्यात आले. या निर्णयाचे अभिनेता ऋषी कपूर यांनी स्वागत केलंय. हा योग्य वेळी घेतलेला निर्णय आहे, असं त्यांनी ट्विट केलंय. देशातल्या अनेक रस्ते आणि इतर प्रकल्पांना नेहरू-गांधी परिवाराची नावं का द्यायची, अशी जाहीर भूमिका घेत आठवड्यांपूर्वी ऋषी वादाला सुरुवात केली होती. तेव्हाही ट्विटरवर त्यांना खूप पाठिंबा मिळाला होता.

असे म्हणाले ऋषी कपूर...
‘चांगले आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय ! महाराष्ट्र सरकारनं एका चांगल्या गोष्टीची सुरुवात केलीय. अभिनंदन!’

Web Title: Look at Rishi Kapoor's Poona Gandhi family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.