ये हसीन हाथ..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 07:54 IST2018-04-05T07:54:46+5:302018-04-05T07:54:46+5:30

सोनम कपूरच्या रफल सिल्व्ह सध्या चर्चेचा विषय आहेत. अशा बाह्या या उन्हाळ्यात आपल्याला शोभतील का?

Long sleeves clothes fashion trends | ये हसीन हाथ..

ये हसीन हाथ..

मार्च, एप्रिल, मे हे उन्हाळ्याचे महिने सुटसुटीत कपड्यांचे. शाल, स्वेटर, श्रग यापासून मुक्त असलेले ! त्यामुळे आपल्या हातांचं सौंदर्य खुलवणाऱ्या बाह्या बिनधास्तपणे वापरण्याची संधी या उन्हाळ्यात सोडता कामा नये. हल्ली सोनम कपूर ते कतरिना कैफ या फॅशनिस्टाही बाह्यांचे प्रयोग करत आहेत. आपणही ते करून पाहिले तर?

लांबसडक बाह्या
सहसा जॉर्जेट, शिफॉन किंवा तत्सम पातळ कापडाच्या असलेल्या या बाह्या हे एक नवीन स्टाइल स्टेटमेंट म्हणून ओळखलं जात आहेत. या बाह््या कोपरापर्यंत शिवलेल्या असतात आणि नंतर मोकळ्या सोडल्या जातात. या बाह्या पार्टी वेअरसाठी सुरेख दिसतात. सोनम कपूरने घातलेल्या एम्ब्रॉयडरी ड्रेसवर लांबसडक बाह्या सुरेख दिसल्या.

फुगेरी बाह्या

फुगेरी बाह्या या जुन्या काळाच्या ब्लाऊजमध्ये किंवा लहान मुलींच्या फ्रॉकला शोभतात असा आपला समज आहे. पण याच फुगेरी बाह्यांनी आता एका वेगळ्या रूपात कम बॅक केलाय. कतरिना कैफच्या निळ्या टॉपच्या लांबट निमुळत्या फुगेरी बाह्या सुरेख दिसल्या.

कोल्ड शोल्डर

महागड्या ब्रॅण्ड्सपासून ते अगदी फॅशन स्ट्रीट वर कोल्ड शोल्डर टॉप्स आणि ड्रेसेस आपल्याला पाहायला मिळतात. विशेष म्हणजे ही स्टाइल वेस्टर्न टॉप्स, ड्रेसेसपासून ते अगदी कुर्ता, लेहेंगा-चोली स्टाइल्स ना पण सुरेख दिसते.

बेल स्लीव्हज

बेल स्लीव्हज सध्या सेलिब्रिटीजच्या पसंतीस पडताना दिसत आहे. दंडाला हलकीशी घट्ट आणि शेवटी झालर असणारी ही बेल स्लीव्ह एकदम क्लासी लूक देते.

रफल स्लीव्हज

कॉलेज तरुणींना शोभणारी, एकदम कॅज्युअल लूक देणारी रफल स्लीव्ह फ्रेश लूक देऊन जाते. सोनम कपूरचा रफल स्लीव्ह असलेला पांढरा टॉप कोणालाही हवाहवासा वाटेल.



श्रुती साठे
(फॅशन डिझायनर आहेत.)

sa.shruti@gmail.com

Web Title: Long sleeves clothes fashion trends

टॅग्स :fashionफॅशन