सत्या नडेलांची लाँग मिटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 11:09 IST
सत्या नडेला दर महिन्याला आपल्या सहकार्यांची तब्बल आठ तास बैठक घेतात.
सत्या नडेलांची लाँग मिटिंग
सत्या नडेला दर महिन्याला आपल्या सहकार्यांची तब्बल आठ तास बैठक घेतात. याचा अर्थ असा नाही की ते या आठ तासांच्या मिटिंगमध्ये त्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांना सूट देतात. त्यांनाही या मिटिंगला बसावेच लागते.द वॉल स्ट्रिट र्जनरला नडेला यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, प्रत्येक महिन्याच्या कुठल्याही एका शुक्रवारी ही आठ तासांची बैठक ते घेतात. उरलेल्या तीन आठवड्यात ते फक्त चार तासांसाठी बैठक घेतात. त्यांचे असे म्हणणे आहे की, कुठल्याही संस्थेच्या वरिष्ठ नेतृत्त्वाच्या चमुने याचे अनुकरण केले पाहिजे. त्यामुळे कुठलीही संस्था त्यांच्यासमोर असलेल्या अडचणी हळूहळू कमी करू शकते.बुल्मबर्ग बिझनेसमधल्या एका लेखात असे नोंदविण्यात आले की, नडेला वरिष्ठ अधिकार्यांच्या कामगिरीचा आलेख नेहमीच डॅशबोर्डवर ठेवत असतात. या आलेखांमध्ये त्यांनी उत्पादनांवर केलेली आर्थिक कामगिरीचा उल्लेख असतो. हा डॅशबोर्ड मग ज्या शुक्रवारी वरिष्ठ अधिकार्यांची बैठक असते तिथे आणला जातो. ज्यामुळे संपूर्ण व्यवसायात कोण-कुठे कमी पडते याचा समन्वय साधण्यात मदत होत असते.त्यांची ही बैठक घेण्याची निती म्हणजे जास्त ऐकणे कमी बोलणे आणि योग्य वेळेवर निर्णय देण्यासाठी कामी येते. वरिष्ठ अधिकार्यांच्या मिटिंगशिवाय नडेला कनिष्ठ कर्मचार्यांसोबत सुद्धा वेळोवेळी संवाद साधतात. ते त्यांच्याकडून कामाविषयी आणि त्यांच्या अडचणींविषयी जाणून घेतात.