‘लाईफस्टेज’ अॅप अँड्रॉईडवरही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2016 17:38 IST2016-11-20T17:38:24+5:302016-11-20T17:38:24+5:30
अल्पावधीतच लोकप्रिय झालेले फेसबुकचे ‘लाईफस्टेज’ अॅप आता अँड्रॉईडवरही दिसू शकते.

‘लाईफस्टेज’ अॅप अँड्रॉईडवरही
अ ्पावधीतच लोकप्रिय झालेले फेसबुकचे ‘लाईफस्टेज’ अॅप आता अँड्रॉईडवरही दिसू शकते. विशेष म्हणजे हे अॅप खास टीन एजर्सला केंद्रस्थानी ठेवून विकसित करण्यात आले आहे. हे अॅप दोन महिन्यांपूर्वी आयओएस या आॅपरेटींग प्रणालीवर सादर करण्यात आले होते. आता ते अँड्रॉईड युजर्ससाठी गुगलच्या प्ले स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले आहे. यात युजर आपल्या दिवसभरातील घडामोडी शॉर्ट व्हिडीओजच्या साहाय्याने आपली वैयक्तिक माहिती व्हिडीओजच्याच माध्यमातून देऊ शकतो. हे अॅप खरे तर एखाद्या व्हिडीओ डायरीसारखेच आहे. याच्या रूपाने फेसबुक हे स्नॅपचॅटला आव्हान देण्याचा प्रयत्न करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.