जरा सांभाळून.. कपड्यांनाही बोलता येतं!
By Admin | Updated: April 29, 2017 16:40 IST2017-04-29T16:40:00+5:302017-04-29T16:40:00+5:30
आपण जे कपडे घालतो ते कपडे नुसतेच पेहराव नसतात. तर ते आपल्याविषयी माहिती देणारे माध्यम असतात. कपड्यांनाही भाषा असते, त्यांनाही बोलता येतं.

जरा सांभाळून.. कपड्यांनाही बोलता येतं!
कामाच्या ठिकाणी फॉर्मल आणि इतर ठिकाणी आपण जे इनफॉर्मल कपडे घालतो ते कपडे नुसतेच पेहराव नसतात. तर ते आपल्याविषयी माहिती देणारे माध्यम असतात. कपड्यांनाही भाषा असते, त्यांनाही बोलता येतं. फक्त त्यांची बोलण्याची पध्दत वेगळी असते. खरंतर न बोलताही आपल्या अंगावरचे कपडे समोरच्याला खूप काही सांगून जातात. त्यामुळे आपलं इंप्रेशन कुठेही चांगलं पाडायचं असेल तर आपल्याला आधी कपडे नीट निवडता यायलाच हवेत.