२००० आणि ५००च्या नोटेवर ऐका मोदींचे भाषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2016 17:28 IST2016-11-20T17:28:19+5:302016-11-20T17:28:19+5:30
आठ नोव्हेंबरला रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद करण्यात येत असल्याची आकस्मिक घोषणा करून सर्व देशवासियांना जोरदार धक्का दिला होता.
.jpg)
२००० आणि ५००च्या नोटेवर ऐका मोदींचे भाषण
आ नोव्हेंबरला रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद करण्यात येत असल्याची आकस्मिक घोषणा करून सर्व देशवासियांना जोरदार धक्का दिला होता. त्यावेळचे भाषण नव्याने आलेल्या २००० आणि ५००च्या नोटांवर ऐकता येणार आहे. या नोटा स्कॅन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्याची सुविधा देणारे अॅप आता विकसित करण्यात आले आहे. या नवीन नोटा देशाच्या कानाकोपºयात पोहोचल्या असून, दोन्ही नोटांना स्कॅन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आठ नोव्हेंबरचे नोटबंदीची घोषणा करणारे भाषण ऐकता येणार आहे. यासाठी ‘मोदी की-नोट’ हे खास अॅप तयार करण्यात आले आहे. काही दिवसांमध्येच हे अॅप तुफान लोकप्रिय ठरले असून, सोशल मीडियातही याचीच चर्चा सुरू आहे.