पांढऱ्या रंगाने द्या हटके लूूक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 19:36 IST2016-10-22T19:36:37+5:302016-10-22T19:36:37+5:30
जर आपल्याला जास्त मेहनत न घेता सर्वांपेक्षा हटके आणि क्लासी दिसायचे असेल तर...

पांढऱ्या रंगाने द्या हटके लूूक!
जर आपल्याला एथनिक लूक हवा असेल तर एखाद्या गडद रंगाच्या लॉन्ग स्कर्ट सोबत पांढऱ्या रंगाचा क्रॉपटॉपसोबतच कोल्हापुरी चप्पल घालत या लूकला टीम अप करू शकता.
पांढरा चिकन कुर्ता पांढऱ्या सलवार सोबत परिधान करा आणि आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी ओढणी किंवा दुपट्टा घ्या. या लूकला अजून हटके करण्यासाठी चंकी ज्वेलरी परिधान करा.
ट्रॅडिशनलसोबतच क्लासी दिसण्यासाठी पांढऱ्या चिकन कुर्त्यासोबत प्रिंटेड पलाझ्झो परिधान करा. आपण जीन्सदेखील परिधान करू शकता. सोबतच रंग-बिरंगी बांगड्या आपल्या लूकला अधिकच सुंदर बनवतील. आपण यासोबतच लहानशी जॅकेटपण घालू शकता.
मल्टीकलरच्या स्कर्टला फिटेड क्रॉप टॉपसोबत परिधान करा, आपण या क्रॉप टॉपला धोती पँट्स किंवा स्कर्टसोबतदेखील परिधान करु शकता.
आपण पांढऱ्या कॉटनचा टॉप, शर्ट किंवा ट्यूनिक जीन्ससोबत परिधान करा, सोबतच टॅन शूज आणि क्लासी हँडबॅगमुळे आपला लूक अधिकच रिच वाटेल.
गडद रंगाचे टॉप्स किंवा पेस्टल रंगाचे अप्पर्ससोबत आपण पांढºया रंगाचे लोअर्स ट्राय करा. डेनिम स्कर्ट, कुलोट्स, पलाझ्झो किंवा स्लीम पँटदेखील ट्राय करु शकता.