आपल्या डॉगीसोबत ‘दिल धडकने दो’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2016 20:23 IST2016-05-06T14:53:55+5:302016-05-06T20:23:55+5:30

पाळीव कुत्रा आणि त्याचा मालक दोघांचे हृदय एकाच बीटवर धडकत असते.

'Let your heart beat' with your dog! | आपल्या डॉगीसोबत ‘दिल धडकने दो’!

आपल्या डॉगीसोबत ‘दिल धडकने दो’!

त्रा हा मानवाचा सर्वात आवडता प्राणी आहे. त्याच्या इतका प्रामाणिक व विश्वासू दुसरा प्राणी नाही असे म्हटले तर काही वावगे ठरू नये. कुत्रा आणि मानवाच्या अतुट बंधनाचा आणखी एक पुरावा समोर आला आहे.

आॅस्ट्रेलियात करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये असे दिसून आले की, पाळीव कुत्रा आणि त्याचा मालक दोघांचे हृदय एकाच बीटवर धडकत असते.

कुत्रा आणि मालक जर जास्तीत जास्त काळ एकमेकांसोबत घालवत असतील तर त्यांच्या हृदयाची वेव्हलेंग्थ जुळून येते आणि सोबत धडकू लागते. यावरून हे सिद्ध होते की, पाळीव कुत्र्यामुळे न केवळ मालकाचे आरोग्य चांगले राहते तर त्याचा फायदा कुत्र्यालाही होतो.

संशोधनात तीन मालकांना त्यांच्या कुत्र्यापासून दूर करण्यात आले. त्यांच्या हृदयावर निरीक्षण करण्यासाठी हार्ट मॉनिटर बसविले होते. त्यावेळी असे दिसून आले की, दुराव्यानंतर एकत्र आल्यावर मालक व कुत्रा यांच्या हृदयामध्ये समक्रमितपणा आढळून आला.

प्रमुख संशोधक मिया कॉब यांनी माहिती दिली की, पाळीव प्राण्यांसोबत असणाºया याच बॉन्डमुळे त्यांना पाहिल्यावर आपला मूड ठिक होतो. आॅफिसहून घरी आल्यावर जेव्हा कुत्रा आपल्यापाशी येतो तेव्हा मन प्रसन्न होऊन जाते. हृदयविकाराचा धोकादेखील यामुळे कमी होऊ शकतो.

Web Title: 'Let your heart beat' with your dog!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.