लिओनार्डाे समाधानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 14:43 IST2016-01-16T01:06:07+5:302016-02-04T14:43:28+5:30

 सामाजिक भान जपणारा अभिनेता 

Leonardo Satisfaction | लिओनार्डाे समाधानी

लिओनार्डाे समाधानी

ओनादरे समाधानी
Leonardo DiCaprio
सामाजिक आणि पर्यावरणविषयक भान जपणार्‍या हॉलिवूडमधील अभिनेत्यांमध्ये  लिओनार्डाे  डिकॅप्रिओचे नाव विशेषत्वाने घेतले जाते. वातावरणात होणारा बदल हा त्याच्या मते सध्याचा गंभीर विषय आहे. याबद्दलच्या चर्चेला सध्या चांगलेच तोंड फुटले आहे. जगभरातील दिग्गज नेते या विषयावर गंभीरपणे विचार करीत आहे. या समस्येवरून सुरू असलेल्या घडामोडींबाबत लिओनादरेने समाधान व्यक्त केले आहे.  लिओनार्डाेने संयुक्त राष्ट्रसंघात पर्यावरणातील बदल या विषयावर भाषण देण्याचा मान मिळवला आहे. पर्यावरणविषयक उपक्रमांसाठी मदत म्हणून त्याने आतापर्यंत प्रचंड रक्कम दान केली आहे. ''आपले भवितव्य कसे असेल, याबद्दल कोणीही बोलत नाही. वातावरणातील अस्थैर्याचा आपल्या भूतलावर, येथील जैवविविधतेवर किती गंभीर परिणाम होईल, याबाबत सर्व जण काळजीत आहेत. मात्र, अलीकडील काळात जगातील नेत्यांनी या विषयांसदर्भात जी भूमिका घेतली, याबाबत मला त्यांचा अभिमान वाटतो, असे तो सांगतो.

Web Title: Leonardo Satisfaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.