लिओनार्डाेला तिसरे गोल्डन ग्लोब

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 23:59 IST2016-01-16T01:05:36+5:302016-02-18T23:59:18+5:30

लिओनार्डाे डी कॅप्रियोला 'दि रेवेनान्ट' या चित्रपटासाठी बेस्ट ड्रामॅटिक अँक्टर हा पुरस्कार मिळाला आह...

Leonardella third Golden Globe | लिओनार्डाेला तिसरे गोल्डन ग्लोब

लिओनार्डाेला तिसरे गोल्डन ग्लोब

ओनार्डाे डी कॅप्रियोला 'दि रेवेनन्ट' या चित्रपटासाठी बेस्ट ड्रामॅटिक अँक्टर हा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण ९ महिन्यात प्रतिकूल वातावरणात पूर्ण झाले होते. त्याला गोल्डन ग्लोब प्रदान करण्यात आले. याच चित्रपटाला मोशन पिरसाठी तसेच दिग्दर्शक अलेझानदरो इनारिटू यांनाही रविवारी रात्री झालेल्या समारंभात गोल्डन ग्लोबने सन्मानित करण्यात आले. या चित्रपटाबद्दल लिओनार्डाे खूपच आनंदी दिसला. या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दलही त्याने आभार मानले. तो म्हणाला, लोकांना वेगळ्या धाटणीचा चित्रपट बघायला आवडतो, याची ही पावती आहे. या समारंभात लिओनार्डाेच्या नावाची पुरस्कारासाठी घोषणा झाली तेव्हा उपस्थितांनी त्याला उभे राहून अभिवादन केले. या पुरस्काराच्या स्पर्धेत ब्रायन क्रॅन्स्टन (ट्रम्बो), मिशेल फासबेंडर (स्टीव्ह जॉब्स), एडी रेडमायन (दि डॅनिश गर्ल) आ िविल स्मिथ (कॉनकशन) आदींचे नामांकन होते. यात लिओनादरेने बाजी मारली. या ४१ वर्षीय अभिनेत्याने आपल्या कारकीर्दीतील तिसरे गोल्डन ग्लोब प्राप्त केले आहे. यापूर्वी त्याला दोन वर्षांपूर्वी 'द वोल्फ ऑफ वालस्ट्रीट' आणि २00५ मध्ये ' द एव्हिएटर' या चित्रपटांसाठी हा सन्मान मिळाला होता.

Web Title: Leonardella third Golden Globe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.