जगभरातील सर्वात मोठ्या नौका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 07:55 IST2016-02-09T02:25:52+5:302016-02-09T07:55:52+5:30

जगभरातील सर्वात मोठ्या नौका नौकानयन हा ‘श्रीमंत’ माणसाचा खेळ आहे, असे म्हटले जाते आणि ते खरंही आहे. सध्याच्या या काळात स्टीम शिप्स, फ्लार्इंग मशिन्स, ट्रान्सपोर्टर्स, सेलबोटस् यांचा खर्च खूपच मोठा आहे. त्यामुळे आपण हे महत्वाचे आणि प्रभावशाली पाऊल आहे, असं म्हणू शकतो. काही जण बोट वेगात चालण्यासाठी कार्यरत असतात, तर काही जण बोट छानपैकी तयार करतात. अशाच काही सर्वात मोठ्या नौकांसंदर्भात या ठिकाणी माहिती देत आहोत.

The largest boat in the world | जगभरातील सर्वात मोठ्या नौका

जगभरातील सर्वात मोठ्या नौका

कानयन हा ‘श्रीमंत’ माणसाचा खेळ आहे, असे म्हटले जाते आणि ते खरंही आहे. सध्याच्या या काळात स्टीम शिप्स, फ्लार्इंग मशिन्स, ट्रान्सपोर्टर्स, सेलबोटस् यांचा खर्च खूपच मोठा आहे. त्यामुळे आपण हे महत्वाचे आणि प्रभावशाली पाऊल आहे, असं म्हणू शकतो. काही जण बोट वेगात चालण्यासाठी कार्यरत असतात, तर काही जण बोट छानपैकी तयार करतात. अशाच काही सर्वात मोठ्या नौकांसंदर्भात या ठिकाणी माहिती देत आहोत.
ईओएस 
ईओएस ही अत्यंत आकर्षक अ‍ॅल्युमिनियम नाव आहे. ही नौका आरामदायी असून, त्याला काचेच्या शिड्या आहेत. ही जगातील सर्वात मोठी नौका असून, त्याची लांबी आणि रुंदीही अधिक आहे. नौकानयन करणारे दोन्ही बाजूने येऊ शकतात. याचे वजन कसे मोजाल हे सांगता येत नाही. 


अथेना
या नौकेवर सारं काही मिळते. स्कुबा लॉकरसह अनेक सुविधा आहेत. खासगी नौकेवर खाद्य पदार्थांची मोठी सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी खूप सारे चष्मे मिळतात.


माल्टेज फाल्कन
माल्टेज फाल्कनचे साहित्य आधुनिक तंत्रज्ञानानी सुसज्ज आहे. स्टील अथवा कार्बन फायबरचा वापर करुन नौकेवर मोठा दबाव ठेवला जातो. याला तीन अत्यंत मोठ्या आकाराच्या उभ्या शीड आहेत. नावेच्या गरजेनुसार त्या वेगवेगळ्या कोनात फिरविता येतात. याची निर्मिती करताना  निर्माता टॉप पर्किन्स याने जगात दुसºया क्रमांकाचे कार्बन फायबर खरेदी केले होते. याला १५ ते ३० कोटी इतका खर्च आल्याचे पर्किन्स यांनी सांगितले.

मिराबेला ५
या समुद्रातील वेग २० नॉट इतका आहे. याचे वजन सुमारे ४४० टन इतके आहे. रॉयल नेव्ही टाईप-४२ डिस्ट्रॉयर पेक्षा आकाराने रुंद आहे. एखाद्या पुलाखालून ही नाव जाऊ शकत नाही. १९,७३० चौरस फुट आकारावर याची बांधणी करण्यात आली आहे. 

फोसिया
याचा वेग १८ नॉटस् इतका आहे. १९७६ साली याची निर्मिती झाली. २००४ पर्यंत ही जगातील सर्वात लांब नौका होती. या नौकेवरही मोठ्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. 

अ‍ॅटलांटिक
या यादीतील ही छान बोट आहे. १९०३ साली टॉऊनसेंड आणि डाऊनी शिपयार्डमध्ये विल्यम गार्डनर यांनी याची उभारणी केली. दोन वर्षानंतर सर्वात वेगाने धावणारी नौका म्हणून याचा गौरव करण्यात आला.

Web Title: The largest boat in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.