भूमी पेडणेकरला आवडतो चांदणीचौक हा भाग खाण्याच्या स्टॉल्ससाठी प्रसिद्ध आहे. परंतु अभिनेत्री भूमी पेडणेकरला मात्र हा परिसर वेगळ्या कारणासाठी आवडतो.
भूमीला आवडतो चांदणी चौक का झुमका
/>चांदणीचौक हा भाग खाण्याच्या स्टॉल्ससाठी प्रसिद्ध आहे. परंतु अभिनेत्री भूमी पेडणेकरला मात्र हा परिसर वेगळ्या कारणासाठी आवडतो. तिने सांगितले की तिचे बरेचसे चांदीचे दागिने आणि स्पेशली झुमके ती याच भागातून घेते. ती म्हणाली, 'माझ्या चुलत भावंडांसोबत मी चांदणीचौकला नेहमी येते. गाडी मेट्रो स्टेशनला पार्क केल्यानंतर आम्ही रिक्षा करून तिथल्या गल्ल्यांमध्ये फिरतो. मागच्या दोन वर्षांपासून माझे तिथे जाणे झाले नाही. त्यामुळे आता वेळ मिळताच मी तिथे पळणार आहे. 'हाऊज खास विलेज' भागातही मला फिरायला आणि शॉपिंग करायला आवडते. तसेच लोधी गार्डन भागात मॉर्निंग वॉक घ्यायलाही जाम आवडते.' भारतीय वेशभुषा करायलाही भुमीला आवडते. साडीत तर ती इतकी कम्फर्टेबल असते की साडीत ती पळू पण शकते.