पुरुषाच्या चालण्यावरुन ओळखा त्याचा स्वभाव !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2017 12:29 IST2017-04-25T06:59:03+5:302017-04-25T12:29:03+5:30
विशेष म्हणजे आपल्या चालण्या-बोलण्याचाही खूप मोठा प्रभाव आपल्या स्वभावावर पडत असतो. पुरुषाच्या चालण्यावरुन त्याच्या स्वभाव कसा ओळखावा याविषयी जाणून घेऊया.
.jpg)
पुरुषाच्या चालण्यावरुन ओळखा त्याचा स्वभाव !
आपणास माहित असेल की, आपण कसे वागतो, कसे बोलतो, कसे चालतो, कपडे कसे परिधान करतो यावरु न आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होत असते. विशेष म्हणजे आपल्या चालण्या-बोलण्याचाही खूप मोठा प्रभाव आपल्या स्वभावावर पडत असतो. आज आम्ही आपणास पुरुषाच्या चालण्यावरुन त्याच्या स्वभाव कसा ओळखावा याविषयी जाणून घेऊया.
* भराभरा चालणारे पुरुष खूप उत्साही असतात. त्यांची फिटनेसही कायम चांगली असते.
* जे पुरुष पोट पुढे काढून चालतात ते डॉमिनेटींग स्वभावाचे असतात. ते दुसऱ्याच्या जीवनात खूप नाक खूपसत असतात. यांना लोकांच्या बाबतीत प्रत्येक लहानमोठी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा असते.
* जे पुरुष खूप जोर देत मटकत चालतात ते खूप संवेदनशील असतात आणि क्रिएटीवही असतात.
* जे पुरुष खांदे आणि छाती समोर काढून चालतात ते शारीरिकदृष्ट्या स्ट्राँग असतात. सरळ चालणाºया पुरुषांमध्ये खूप आत्मविश्वास असतो आणि ते खूप कमी आजारी पडतात.
* जे पुरुष जमिनीवर जास्त दबाव देत चालतात ते फार जिद्दी स्वभावाचे असतात. ते आपल्या प्रत्येक निर्णयावर इतके ठाम असतात की, एकदा कुठला निर्णय घेतला की, ते मागे हटत नाहीत.
* खांदे समोरच्या बाजूस झुकवून चालणारे पुरुष कोणताच निर्णय नीट घेऊ शकत नाही. ते खूप मेहनती असतात पण ब?्याचदा आळशी स्वभावामुळे मागे राहून जातात.
Also Read : HEALTH : चालण्यामुळे कर्करोग्यांच्या आयुष्यामानात सकारात्मक बदल !