किचन गार्डन-निरोगी आरोग्याचा मुलमंत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 09:35 IST2016-01-16T01:13:58+5:302016-02-06T09:35:56+5:30
काही जणांना गार्डनचा खूप शौक असतो. त्यामुळे आपल्या घराजवळ छोटीही जागा रिकामी पडलेली असली तरीही त्या...
.jpg)
किचन गार्डन-निरोगी आरोग्याचा मुलमंत्र
क ही जणांना गार्डनचा खूप शौक असतो. त्यामुळे आपल्या घराजवळ छोटीही जागा रिकामी पडलेली असली तरीही त्या ठिकाणी त्यांच्याकडून गार्डन तयार केले जाते. या गार्डनमुळे मनाला वेगळा आनंद मिळतो. या गार्डनममध्ये आपल्याला किचनमध्ये लागणारा ताजा भाजीपालाही मिळू शकतो. किचनचे गार्डनचे यासह विविध प्रकारचे फायदे आहेत. फ्रेश भाज्या : या गार्डनमध्ये आपल्याला फ्रेश भाज्याबरोबरच तुलसीचे व कढिपत्ताची पानेही फ्रेश मिळू शकतात. आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टीसाठी मार्के टला जाण्याची कोणतीही आवश्यकता नाही. यामुळे आपला वेळही वाचू शकतो.
निरोगी भाजी : आपल्या किचन गार्डनमध्ये असलेल्या भाज्या या कोणत्या पाण्याच्या आहेत. हे आपल्याला माहिती असते. बाजारात येणार्या भाज्या कोणत्या पाण्यावर आलेल्या असतात, त्याचा काहीच भरोसा राहत नाही. गार्डनमुळे रोगरहित भाज्या आपल्याला मिळू शकतात.
आरोग्यवर्धक : आपल्या गार्डनमधील तुळसी, धने व पुदीना यांचे सेवन केल्याने विविध आजारांपासून आपली सुटका होऊ शकते. ताप व दमाच्या आजारावर त्याचा उपयोग केला जातो. गार्डनमधील भाज्या आपल्याला निरोगी बनविण्याचे काम करतात.
ताण कमी : किचन गार्डनमुळे आपल्या मनावरील अदृश्य तणाव कमी होतो.
आपले लक्ष गार्डनच्या देखभालीवरच केंद्रीत होत असते. त्यामुळे कोणत्याच नकारात्मक गोष्टींचा विचार आपल्या मनात येत नाही.