कायने वेस्टचे अँगर मॅनेजमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2016 01:29 IST2016-02-21T08:27:18+5:302016-02-21T01:29:49+5:30

पती रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही, हे लक्षात आल्यावर किमने त्याला पुन्हा एकदा अँगर मॅनेजमेंट थेरपीला पाठवण्याचा निर्णय घेतला

Keyne West's Anger Management | कायने वेस्टचे अँगर मॅनेजमेंट

कायने वेस्टचे अँगर मॅनेजमेंट

यने वेस्ट हा गायक म्हणून जेवढा प्रसिद्ध आहे, तेवढाच त्याच्या रागीट स्वभावासाठीही ओळखला जातो. अलीकडेच त्याने ग्रॅमी अवॉर्ड विजेत्या टेलर स्विफ्ट हिच्याबद्दल असभ्य टिप्पणी केली होती. शिवाय कायने याने आपलाच एकेकाळचा सहकारी लेखक रेनफेस्ट यालाही सोडले नाही.

अखेर कायनेची पत्नी किम कर्दाशियन हिने हा सर्व प्रकार गंभीरपणे घेतला आहे. आपला पती रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही, हे लक्षात आल्यावर किमने त्याला पुन्हा एकदा अँगर मॅनेजमेंट थेरपीला पाठवण्याचा निर्णय घेतला. 



या कामात रेनफेस्टनेही किमला सहकार्य केले आहे. अध्यत्मिक आणि मानसिक समुपदेशनाच्या रुपात कायनेला मदत हवी आहे. आपण सर्व जण त्याच्या पाठीशी उभे राहू या, असे आवाहन रेनफेस्टने ट्विटरद्वारे चाहत्यांना केले आहे.

Web Title: Keyne West's Anger Management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.