केलीचा संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 03:51 IST2016-01-16T01:15:23+5:302016-02-13T03:51:21+5:30

 केलीचा संकल्प  

Kelly's resolution | केलीचा संकल्प

केलीचा संकल्प

ली जेनर हिने १९ कामांची यादी तयार केली असून, ती कामे पूर्ण करण्याचा तिने संकल्प केला आहे. ऑगस्ट २0१६ मध्ये केली १९ व्या वर्षात पर्दापण करणार आहे. तिच्या मते, आयुष्यात काही ध्येय असेल तर जगण्याला प्रेरणा मिळते. मी जेव्हा १८ व्या वर्षात पर्दापण केले तेव्हा जगण्याची दिशाच मिळत नव्हती.
यावर चिंतन केल्यानंतर मी ही यादी तयार केली आहे. या १९ कामांच्या सूचीमध्ये कॅलिफोर्निया येथील तिच्या घराच्या अंगणात असलेल्या स्विमिंग पुलाची दुरुस्ती करण्याचा देखील समावेश असल्याचे तिने स्पष्ट केले आहे.
सोशल मीडिया.. नो वे
केट विंसलेट हिने तिच्या दोन्ही मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवले आहे. तिच्यामते मुलांवर सोशल मीडियाचा दुष्परिणाम होतो. त्यामुळे माझी किशोरवयीन मुलगी मिया आणि ११ वर्षांचा मुलगा जो याला सोशल मीडिया वापरण्यावर सक्त प्रतिबंध घातले आहेत. याशिवाय मी देखील ट्विटर आणि फेसबुक अकाऊंट बंद केले आहेत.
आय एम सो लकी
अभिनेत्री लूसी लियु हिने हिने तिचा मुलगा रॉकवेल लॉयड लियू याच्या जन्माची घोषणा केली आहे. लियुने तिच्या नवजात बाळासहचे फोटो शेअर केले असून, त्याखाली मी खूप भाग्यशाली असल्याचे म्हटले आहे. रॉकवेल लियुच्या जन्मामुळे माझे संपूर्ण आयुष्य बदलून गेले आहे. हा एक चांगला अनुभव असून, त्याचा नाजूक चेहरा बघितल्यानंतर थकवा दूर होत असल्याचे तिने म्हटले आहे. दरम्यान दोघांचीही प्रकृती बरी आहे.

Web Title: Kelly's resolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.