कॅलीला रडू कोसळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 03:23 IST2016-03-17T10:23:08+5:302016-03-17T03:23:08+5:30
गायिका कॅली क्लार्कसन अमेरिकन आयडलमध्ये परफॉर्म करत असताना रडायला लागली. कॅली या शोच्या फायनलमध्ये पोहचली होती.

कॅलीला रडू कोसळले
ग यिका कॅली क्लार्कसन अमेरिकन आयडलमध्ये परफॉर्म करत असताना रडायला लागली. कॅली या शोच्या फायनलमध्ये पोहचली होती. जेव्हा तिला परफॉर्म करायचे होते, तेव्हा ती गातानाच रडायला लागली. तिला बघुन गायक कीथ अर्बन आणि जेनिफर लोपेज यांना देखील अश्रृ आवरता आले नाही. कॅलीने तिच्या ‘पीस बाय पीस’ या भावनात्मक गाण्याने सगळ्यानाच भावूक केले होते. उपस्थितांनी उभे राहून तिच्या या परफॉर्मन्सला दाद दिली. जजनी देखील तिचे कौतुक केले.