इंटरव्ह्यू देताना हातवारे जरा जपून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:29 IST2016-01-16T01:15:16+5:302016-02-06T10:29:06+5:30

​जॉन मॉलिडोर आणि बार्बरा पारुस यांनी 'क्रेझी गुड इंटरव्ह्युविंग' नावाच्या पुस्तकात याविषयी लिहिले आहे.

Keeping the gestures in front of giving an interview | इंटरव्ह्यू देताना हातवारे जरा जपून

इंटरव्ह्यू देताना हातवारे जरा जपून

ब इंटरव्ह्यूव म्हणजे जरा टेंशनचीच गोष्ट आहे. कसे बसावे, काय बोलावे, कोणाशी सर्वात आधी हात मिळावा असे एक ना अनेक प्रश्न अक्षरश: छळ करतात आपला. नोकरीचा प्रश्न असल्याने आपण नर्व्हस असतो. मग अशा वेळी सुरू होते आपल्या हाताची हालचाल.

मुलाखत देताना घडीकडे पाहणे, खिशात हात टाकू न चावीशी खेळणे, विशिष्ट हातवारे करणे आपले इम्प्रेशन खराब करू शकते. त्यामुळे हातांचा जर नीट उपयोग केला तर नोकरी मिळण्याचे चान्सेसही वाढू शकातात.

जॉन मॉलिडोर आणि बार्बरा पारुस यांनी 'क्रेझी गुड इंटरव्ह्युविंग' नावाच्या पुस्तकात याविषयी लिहिले आहे. बघा, काय म्हणतात ते..

१. हाताचे तळवे लपवू नका : उघडपणे हाताचे तळवे दाखवल्याने तुमचा प्रामाणिकपणा दिसतो. याचा संबंध तुमच्या खरेपणा, विश्‍वासूपणाशी असतो, असे बार्बरा व अँलन पीज यांनी म्हटले आहे. इतिहासामध्येसुद्धा उघड्या हाताचा अर्थ धोका किंवा दगाबाजी न करण्याचा हेतू नसणे असा आहे.

२. बोटांचा त्रिकोण बनवा : दोन्ही हातांचे बोटं जोडून बनवलेल्या त्रिकोणातून तुमचा आत्मविश्‍वास झळकतो. कार्लाेस किन्से गोमन म्हणतात की, राजकीय नेते आणि एक्झिक्युटिव्ह जेव्हा एखाद्या मुद्यावर जोर देतात तेव्हा अशा प्रकारे त्रिकोण तयार करतात.

३. हाताचा तळवा खालच्या दिशेने नको : समोरच्या व्यक्तीशी हात मिळवाताना कधीही आपल्या हाताचा तळवा खालच्या दिशेने असू नये. यामुळे आपण त्यांच्यावर वर्चस्व गाजवायचे आहे असे दिसते. त्यामुळे ही चूक करू नका.

४. खिशात हात नका ठेवू : तुम्ही जर खिशात हात टाकू न बोलत असाल तर याचा अर्थ तुम्ही काही तरी लपून ठेवत आहात. समोरची व्यक्ती तुमच्यावर विश्‍वास ठेवणार नाही. तुमचा हेतू प्रामाणिक नाही असा याचा अर्थ होतो.

५. उगीच हातवारे करू नका : बोलताना उगीच हातवारे केल्यामुळे तुम्हाल तुमच्या बोलण्यावर विश्‍वास नाही, असा होऊ शकतो. एका ठराविक प्रमाणात आणि मुद्याला अनुसरूनच हाताचे इशारे केले पाहिजेत.

६. बोटाने टॅप करू नका : टेबल, खुर्चीवर बोटोने टकटक आवाज केला तर त्यातून तुमची अस्वस्थताच दिसून येते.

Web Title: Keeping the gestures in front of giving an interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.