केट बनणार माफिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 08:16 IST2016-02-25T15:16:02+5:302016-02-25T08:16:02+5:30
टायटॅनिक चित्रपटातून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री केट विंसलेट तिच्या आगामी ‘ट्रिपल-९’ या चित्रपटात माफिया सरगनाची भूमिका साकारणार आहे.

केट बनणार माफिया
या भूमिकेबाबत केट म्हणते की, ही भूमिका साकारणे माझ्यासाठी आव्हान होते. जेव्हा मी पटकथा वाचली तेंव्हा मी ही भूमिका साकारू शकणार नाही, हीच माझी पहिली प्रतिक्रिया होती. मात्र नंतर मी मनाची तयारी करून हे आव्हान पेलण्याचे ठरविले.
जॉन हिलकोट दिग्दर्शित ‘ट्रिपल-९’ केटच्या व्यतिरिक्त वूडी हॅरलसन, केसी एफ्लेक आणि च्यूएटेल एजियोफर यांची देखील महत्त्वाची भूमिका आहे.