अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस (Kamala Harris) यांची सावत्र मुलगी(Step Daughter) एला एम्हॉफ (Ella Emhoff) ने न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये (New York Fashion Week) अमेरिकन लेबल प्रोजोआ शॉलर (Proenza Schouler) एका आश्चर्यजनक रनवेची सुरूवात केली. २१ वर्षीय एला तेव्हा चर्चेत आली जेव्हा ती मियू मिउ कोट आणि सिग्नेचर चष्म्यात हॅरिस यांच्या शपथविधीवेळी दिसली होती. हॅलो मॅगझिननुसार, २०२१ मध्ये राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीच्या एक आठवड्यानंतर तिला IMG मॉडलने साइन केलं होतं.

ही एजन्सी मॉडलिंगच्या जगातील काही सर्वात मोठ्या नावांचं प्रतिनिधित्व करते ज्यात कार्ली क्लॉस, जीजी हदीद आणि गिसेले बुंडचेन यांचा समावेश आहे. डौग एम्हॉफ यांची मुलगी आणि व्हीपी कमला हॅरिस यांची सावत्र मुलगी एला एम्हॉफने प्रोजेनो शॉलरच्या नव्या कॅम्पेनमध्ये हिरव्या टक्सीडो सूट आणि चष्म्यात दिसली होती. 

काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर तिने फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. सोबतच डिझायनर्सचे धन्यवादही मानले होते. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, या वर्षी इतर ब्रॅन्डसोबतच प्रोजोन शॉलर आपल्या फॉल-विंटर २०२१चे वुमेन्सविअरला डिजिटल रूपात सादर करत आहे.
 

Web Title: Kamala Harris step daughter Ella Emhoff makes modelling debut at new york fashion week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.