जूलियाची अनवानी पायाने रेड कार्पेटवर एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2016 15:00 IST2016-05-14T09:30:24+5:302016-05-14T15:00:24+5:30
६९ व्या कान्स फिल्म महोत्सवाच्या रेड कार्पेटवर प्रसिद्ध हॉलीवुड अभिनेत्री जूलिया रॉबर्टस अनवानी पायाने बघावयास मिळाली.

जूलियाची अनवानी पायाने रेड कार्पेटवर एंट्री
६ व्या कान्स फिल्म महोत्सवाच्या रेड कार्पेटवर प्रसिद्ध हॉलीवुड अभिनेत्री जूलिया रॉबर्टस अनवानी पायाने बघावयास मिळाली. ती तिचा आगामी चित्रपट ‘मनी मोंस्टर’च्या स्क्रीनिंगसाठी त्याठिकाणी पोहचली होती. कान्समध्ये ड्रेसकोड संबंधी अतिशय कडक नियम आणि कायदे आहे. अशात जूलियाने अनावानी पायाने एंट्री करून नियमांचे उल्लंघन केले आहे. जूलियाने कान्सच्या रेड कार्पेटवर निळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. यावेळी तिने गळ्यात पेंडेंट घातला होता आणि मॅचिंग अंगुठी घातली होती. पायºया चढताना जेव्हा तिने गाऊन वर उचलला तेव्हा तिने पायात काहीही परिधान केले नसल्याचे समोर आले. यावेळी अभिनेता जॉर्ज क्लूनी आणि त्याची पत्नी अमाल क्लूनी यांनी देखील तिच्यासोबतच एंट्री केली.