​हृतिक-कंगनाच्या वादात माझी भूमिका न्यायाधीशाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 21:00 IST2016-06-08T15:30:50+5:302016-06-08T21:00:50+5:30

कंगना आणि ह्रतिकच्या वादात रवीनाची भूमिका न्यायाधिशाची असल्याचे स्पष्ट करून एका नव्या चर्चेला सुरूवात केली आहे.

Judiciary is my role in the Hrithik-Kangan dispute | ​हृतिक-कंगनाच्या वादात माझी भूमिका न्यायाधीशाची

​हृतिक-कंगनाच्या वादात माझी भूमिका न्यायाधीशाची

गना आणि ह्रतिकच्या वादात रवीनाची भूमिका न्यायाधिशाची असल्याचे स्पष्ट करून एका नव्या चर्चेला सुरूवात केली आहे. 
कंगना रणौत आणि हृतिक रोशन यांच्यात सुरू असलेल्या कायदेशीर वादात अभिनेत्री रवीना टंडन हिने कंगनाला पाठिंबा दिल्याचे वृत्त वाºयासारखे पसरले होते. त्यानंतर रवीनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हृतिक-कंगनाच्या वादात मी कोणा एकाची बाजू घेत नसून, माझी भूमिका न्यायाधीशाची असल्याचे रवीनाने म्हटले आहे. 

रवीनाने एका इंग्रजी वृत्तपत्रासाठी ब्लॉग लिहीला होता. प्रत्येकाला असलेल्या घटनात्मक अधिकारांवर भाष्य या ब्लॉगमध्ये करण्यात आले होते. याशिवाय, कंगना-हृतिकमधील वादालाही स्पर्श करण्यात आला होता. मात्र, अनेक वेब पोर्टल्सनी रवीनाने ब्लॉगमधून कंगनाला पाठिंबा दिल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. रवीनाला याबाबतीत विचारण्यात आले. त्यावेळी तिने कंगनाला पाठिंबा दिल्याचे वृत्त पूर्णपणे फेटाळून लावले. रविनाने ट्विट केले की, एका मुलीला किंवा मुलाला पाठिंबा देण्याचा हा विषय अजिबात नाही. जे कोणी माज्या ब्लॉगवर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. त्यांनी ब्लॉगमधील माझे मत नीट समजून घेण्याचा प्रय मी फक्त एखत्न करावा. कोण चूकीचे आणि कोण बरोबर याचा मी न्यायनिवाडा केलेला नाही.

Web Title: Judiciary is my role in the Hrithik-Kangan dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.