पोकेमॉनसाठी नोकरी सोडलेल्या तरुणाला मिळाले स्पॉन्सर आणि अनोख्या जॉबची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2016 14:24 IST2016-07-22T08:47:35+5:302016-07-22T14:24:48+5:30

नुकतेच काही मिनिटांपूर्वी त्याने फेसबुकवर जाहीर केले की त्याला फिनलँडमधून स्पॉन्सरशिप मिळाली आहे.

The job vacancies for a pokemon, the sponsored and unique job offers | पोकेमॉनसाठी नोकरी सोडलेल्या तरुणाला मिळाले स्पॉन्सर आणि अनोख्या जॉबची ऑफर

पोकेमॉनसाठी नोकरी सोडलेल्या तरुणाला मिळाले स्पॉन्सर आणि अनोख्या जॉबची ऑफर

ref="http://www.cnxdigital.com/article/lifestyle/trends/9211">आम्ही काही दिवसांपूर्वी तुम्हाला टॉम करी या तरुणाबद्दल सांगितले होते. न्यूझिलँडच्या टॉमने ‘पोकेमॉन गो’ खेळण्यासाठी चक्क नोकरी सोडली. सर्व १५१ पोकेमॉन्स पकडण्याच्या ‘मिशन’ वर तो निघाला आहे. नुकतेच काही मिनिटांपूर्वी त्याने फेसबुकवर जाहीर केले की त्याला फिनलँडमधून स्पॉन्सरशिप मिळाली आहे. म्हणजे त्याला ‘पोकेमॉन गो’ खेळण्यासाठी कराव्या लागणार्‍या प्रवासाचा खर्च या स्पॉन्सरशिपमधून करण्यात येणार.

एवढेच नाही तर अमेरिकेतील एका कंपनीने त्याला ‘पोकेमॉन गो कोच’ होण्याची जॉब आॅफर दिली आहे. मोबाईल गेम खेळण्यासाठी हातची चांगली नोकरी सोडल्यावर घरच्यांच्या विरोधाला त्याला सामोरे जावे लागले होते. परंतु जगभरातील मीडियाने त्याची दखल घेतल्यानंतर तो रातोरात ‘स्टार’ झाला. सोशल मीडियावर लोक त्याला शुभेच्छा देत आहेत. त्याची ‘फॅन फॉलोविंग’च तयार झाली असे म्हणा ना.



फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमध्ये त्याने ‘तो त्याच्या पोकेमॉन गो प्रवासावर तयार करत असलेल्या डॉक्युमेंटरीचे टीझर उद्या चित्रित करणार आहे’ अशीसुद्धा माहिती दिली आहे. ‘लाईफ इज गूड’. आयुष्य एकदम मस्त चालू आहे, असे तो म्हणतो.

टॉमला अनेक  नव्या लोकांना भेटण्याची तसंच विविध ठिकाणी फिरण्याची संधी मिळत आहे. 'मी अशा अनेक ठिकाणी फिरत आहे जिथे मला जाण्याची संधी मिळाली नसती', असं टॉम सांगितो. आता पाहूया त्याचा हा प्रवास त्याला कुठे कुठे घेऊन जातो.

जपानमध्ये बर्‍याच प्रतीक्षेनंतर ‘पोकेमॉन गो’ लाँच झाला असून लवकरच भारतातही तो अधिकृतरीत्या उपलब्ध करून देण्यात येईल अशी शक्यता आहे.

Web Title: The job vacancies for a pokemon, the sponsored and unique job offers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.