यंदाचे एमी अॅवॉर्ड्स जरी सप्टेंबर महिन्यात होणार असले तरी होस्टची घोषणा झाल्यामुळे त्याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.
चार वर्षांनंतर पुन्हा एकदा जिमी किमेल एमी अॅवॉर्ड्स होस्ट करणार आहे. नुकतेच त्याने याची ट्विटरवरून माहित दिली.
'१८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या एमी पुरस्कार सोहळ्याचे सुत्रसंचालन मी करणार आहे. त्याआधी उन्हाळ्याचा आनंद घेऊया. '
I am hosting the #Emmys on Sunday Sept 18. Until then, have a great summer.— Jimmy Kimmel (@jimmykimmel) March 7, 2016
लॉस एंजिलिस येथील मायक्रोसॉफ्ट थिएटरमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. याआधी अँडी सॅमबर्ग (2015), सेठ मेयर्स (23014) आणि नील पॅट्रीक हॅरिस (2013) यांनी एमी होस्ट केले आहेत.