पायांच्या रक्षणासाठी ‘जेल कुशन’
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2016 18:25 IST2016-05-11T12:55:43+5:302016-05-11T18:25:43+5:30
त्रासापासून जेल कुशन मुक्त करतात.

पायांच्या रक्षणासाठी ‘जेल कुशन’
हाय हिल्स घातल्याने शरीराचा भार कधीकधी टाचांवर आणि पुढच्या भागावर अधिक येतो. जास्त वेळ जोर दिल्याने पायांच्या तळव्यांची जळजळ होणे, ते दुखणे, सूज पकडणे हे त्रास सुरू होतात. या हिल्सच्या तळव्याचा भागही कडक असतो त्यातून त्रास अधिक होतो. या सगळ्या त्रासापासून जेल कुशन मुक्त करतात. पायाचे विशिष्ट प्रेशर पॉर्इंट असतात. त्या प्रेशर पॉर्इंटच्या ठिकाणी हे जेल कुशन बसवायचे असतात.
टाच, तळवा, पायांची बोटे अशा तीन महत्त्वाच्या प्रेशर पॉर्इंटवरच्या ठिकाणी लावायला वेगवेगळ्या आकारात या कुशन येतात. या कशा वापरायच्या याचे मार्गदर्शन त्यात केलेले असते. या कुशन पायांचे संरक्षण करतात. या वापरल्यामुळे कोणत्याही एका पॉइंटवर जास्त दाब येत नाही. त्याचप्रमाणे या नरम आणि मऊ असल्याने तळव्यांची जळजळ, सूजही येत नाही. एक कुशन तुम्ही अनेक वेळा वापरू शकता.