जे. के. रोलिंगचा ‘पेन’कडून सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2016 20:03 IST2016-05-18T14:33:06+5:302016-05-18T20:03:06+5:30

जे. के. रोलिंग यांचा ‘पेन’ या साहित्यिक व मानवी हक्कांसाठी लढणाºया संस्थेकडून नुकताच सन्मान करण्यात आला.

J. K. Honor by Rolling 'Pen' | जे. के. रोलिंगचा ‘पेन’कडून सन्मान

जे. के. रोलिंगचा ‘पेन’कडून सन्मान

री पॉटर लेखिका जे. के. रोलिंग यांचा ‘पेन’ या साहित्यिक व मानवी हक्कांसाठी लढणाºया संस्थेकडून नुकताच सन्मान करण्यात आला.

साहित्य आणि मानवतेच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना सन्माननित केल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले आहे. ‘अमेरिकन म्युझियम आॅफ नॅच्युरल हिस्ट्री’ येथे पार पडलेल्या शानदार सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

यावेळी साहित्य क्षेत्रात अनेक ख्यातनाम मंडळी उपस्थित होती. याप्रसंगी बोलताना रोलिंग यांनी विचारस्वातंत्र्यावर भर दिला. प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार मिळाला पाहिजे या मताच्या त्या आहेत.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सांगितले की, रिपब्लिकन पार्टीचे संभाव्य उमेदवार डोनल्ड ट्रम्प यांना इंग्लंडमध्ये येण्यास बंदी घालण्याचा आग्रह करणाºया याचिकेचा मी विरोध केला. कारण असे करणे मानवी मूलभूत अधिकाराची पायमल्ली करण्यासारखे ठरेल.

यंदा पेन संस्थेने इजिप्तमध्ये कैद असलेले लेखक अहमद नाजी यांचासुद्धा सन्मान केला. नाजींच्या भावाने त्यांच्या बदल्यात तो स्वीकारला. या व्यतिरिक्त हॅचेट बुक गु्रपचे सीईटो मायकल पिएट्श्चे आणि फ्लिंट येथील तलावात लीडचे जीवघेणे प्रमाण उजेडात आणणारे डॉ. मोना हॅना-अ‍ॅटिशा व लीअ‍ॅने वॉल्टर्स यांचादेखील सत्कार करण्यात आला.

Web Title: J. K. Honor by Rolling 'Pen'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.