Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 13:26 IST2026-04-09T13:24:50+5:302026-04-09T13:26:04+5:30

Women Fashion Heels: फॅशनच्या जगात 'हील्स' म्हणजेच उंच टाचेचे शूज महिलांच्या स्टाईल आणि आकर्षणाचे प्रतीक मानले जातात. पण तुम्हाला माहीत आहे का, की हील्सची सुरुवात महिलांसाठी नाही, तर पुरुषांसाठी झाली होती.

It started out for men so how did heels become a part of women s fashion trend started in Europe | Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?

Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?

Women Fashion Heels: फॅशनच्या जगात 'हील्स' म्हणजेच उंच टाचेचे शूज महिलांच्या स्टाईल आणि आकर्षणाचे प्रतीक मानले जातात. पण तुम्हाला माहीत आहे का, की हील्सची सुरुवात महिलांसाठी नाही, तर पुरुषांसाठी झाली होती. हे ऐकायला थोडं विचित्र वाटू शकतं, पण हे सत्य आहे. हील्सचा इतिहास अतिशय रंजक आहे आणि काळानुसार आता त्यात बदल होत गेले.

पुरुषांसाठी बनवल्या होत्या हील्स

हील्सचा इतिहास १० व्या शतकापासून सुरू होतो. सुरुवातीला, हील्सचा वापर पर्शियन घोडेस्वार करत असत. घोड्याच्या पाठीवर बसलेले असताना त्यांना आपले पाय रकाबमध्ये स्थिर ठेवण्यासाठी उंच टाचेच्या बुटांची गरज भासत होती. हे डिझाइन त्यांना घोडेस्वारी करताना संतुलन राखण्यास मदत करत होतं. हळूहळू हा ट्रेंड युरोपमध्ये पोहोचला आणि १६ व्या शतकात तो पुरुषांच्या फॅशनचा भाग बनला.

युरोपमध्ये हील्सला 'स्टेटस सिम्बॉल' म्हणून पाहिलं जाऊ लागलं. उंच टाचेचे बूट घालणाऱ्या व्यक्तीला श्रीमंत आणि प्रभावशाली मानले जात होतं, कारण यावरून असं दिसून येत होतं की त्या व्यक्तीला शारीरिक कष्टाची कामं करण्याची गरज नाही. अगदी फ्रान्सचा राजा लुई चौदावा (Louis XIV) यानंही हील्सला आपल्या शाही शैलीचा भाग बनवलं होतं. त्याच्या बुटांना अनेकदा लाल रंगाच्या हील्स असत, ज्या त्याच्या शक्ती आणि प्रतिष्ठेचे प्रतीक होत्या.

महिलांच्या फॅशनमध्ये हील्सची एंट्री

१७ व्या शतकाच्या अखेरीस हील्सची क्रेझ महिलांमध्येही पसरू लागली. या काळात महिला पुरुषांच्या फॅशननं प्रेरित होऊन हील्स घालू लागल्या. हा कल विशेषतः युरोपमध्ये दिसून आला. १८ व्या शतकात पुरुषांमधील हील्सची फॅशन कमी झाली, पण महिलांसाठी मात्र तो फॅशनचा एक अविभाज्य भाग बनला. १९ व्या आणि २० व्या शतकात हील्सनं महिलांच्या फॅशनमध्ये एक नवीन ओळख निर्माण केली. हे केवळ स्टाईलचं प्रतीक बनलं नाही, तर महिलांच्या आत्मविश्वास आणि सक्षमीकरणाचंही प्रतीक मानलं जाऊ लागलं. फॅशन डिझाइनर्सनी हील्स वेगवेगळ्या डिझाइन आणि आकर्षक रूपात सादर केल्या, ज्यामुळे ती महिलांसाठी एक आवश्यक एक्सेसरी बनली.

आधुनिक युगातील हील्स

आजच्या काळात हील्स महिलांच्या फॅशनचा एक महत्त्वाचा भाग आहे. परंतु, आधुनिक युगात कम्पफर्ट आणि स्टाईल या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन हील्सच्या डिझाइनमध्ये अनेक बदल करण्यात आलेत. आता फ्लॅट हील्स, वेज हील्स आणि ब्लॉक हील्स यांसारखे पर्यायही उपलब्ध आहेत, जे महिलांना कम्पफर्ट आणि स्टाईल दोन्ही प्रदान करतात.

Web Title : हील्स: पुरुषों के जूतों से महिलाओं के फैशन स्टेटमेंट तक, एक इतिहास।

Web Summary : शुरुआत में फारसी घुड़सवारों के लिए, हील्स यूरोपीय स्टेटस सिंबल बन गईं। लुई XIV ने उन्हें लोकप्रिय बनाया। 17वीं शताब्दी में महिलाओं ने हील्स को अपनाया, जो सशक्तिकरण और शैली का प्रतीक बन गईं, आधुनिक डिजाइनों में आराम और शैली को प्राथमिकता दी गई।

Web Title : Heels: From men's footwear to women's fashion statement, a history.

Web Summary : Initially for Persian horsemen, heels became a European status symbol. Louis XIV popularized them. Women embraced heels in the 17th century, evolving into a symbol of empowerment and style with diverse modern designs prioritizing both comfort and style.